Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावित, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल, सागर शिंपी, उपायुक्त निर्मला गायकवाड, महापालिका आरोग्य विभागाचे सहायक उपायुक्त समीर बोरोले आदी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मुंकूद मेटकर, माजी अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीत महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम असेल. त्यानंतर पहिल्या दहा मंडळांना विसर्जन क्रमांक दिला जाणार नाही. त्यांना थेट प्रवेश दिला
विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्त वाहनांना परवानगी देण्यात येणार नाही. केवळ दोनच वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यापेक्षा अधिक वाहने मंडळांना ठेवता येणार नाहीत, असेही कळविण्यात आले आहे. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या सूचना मांडल्या. सार्वजनिक मंडळाची बैठक शांततेत पार पडली.
Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे …
परंतु कार्यकर्ते जात असताना महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ सार्वजनिक मंडळाचे माजी पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे थेट एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी रात्री बारा वाजेपासून आपला क्रमांक निश्चित करावयाचा आहे. रात्री त्यांनी आपल्या मंडळाचे वाहन रांगेत लावायचे आहे. त्यानुसारच त्यांना क्रमांक देण्यात येईल. मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत दिलेल्या वेळेतच आपली मिरवणूक काढावयाची आहे. मंडळांनी जर उशीर केला तर त्यांना त्यांच्या त्या क्रमांकावरून काढून शेवटच्या नंबरवर काढण्यात येईल.
Jalgaon News : मुक्ताईनगर हादरलं! भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू
विसर्जन मिरवणुकीत मंडळानी डीजे लावू नये, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र, तरीही जे मंडळ डीजे लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईलच. त्यांना मिरवणुकीत कोणताही मज्जाव करण्यात येणार नाही; परंतु कालांतराने नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे मिरवणुकीत डीजे लावू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.
मिरवणुकीत विविध संस्थांतर्फे मंडळाचे स्वागत करण्यात येते. परंतु काही संस्थांचे स्वागत व्यासपीठ पुढे लावण्यात येते. त्यामुळे मिरवणुकीस अडथळा ठरतो. त्यामुळे हे व्यासपीठ मागील बाजूस लावण्यात यावेत, असे कळविण्यात आले आहे.






