Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

Aaditya Thackeray : कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून वृक्षतोडीचा वाद पेटला आहे. आदित्य ठाकरे यांनी साय डोंगराला भेट देत फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Oct 26, 2026 | 07:05 PM
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

Follow Us
Follow Us:
  • कर्जत-भीमाशंकर जंगलतोडीवरून वाद
  • हजारो झाडांच्या तोडीचा दावा, पर्यावरणप्रेमी संतप्त
  • ‘मरण आलं तरी चालेल’, आदित्य ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा
 

महाराष्ट्रात विकासाच्या नावाखाली जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्जत-भीमाशंकर परिसरातील साय डोंगरावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोड होत असलेल्या परिसराला भेट देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Aaditya Thackeray)

‘मेगावॅट नाही, तुम्ही मेगा वाट लावताय’

प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाणार असल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.

‘तुम्ही मेगावॅट म्हणताय, पण इथे मेगा वाट लावताय,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. प्रकल्पासंदर्भात सार्वजनिक सुनावणी झाली होती का, स्थानिकांनी घेतलेल्या हरकतींचं काय झालं आणि पर्यायी जागांचा विचार करण्यात आला होता का, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

Karjat Torrent Power Project : ‘फेक नरेटिव्ह पसरवू नका, कर्जत प्रकल्प पर्यावरणाला पूरक’ वृक्षतोडीच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

‘मरण आलं तरी लढा थांबणार नाही’

साय डोंगरातील जंगल वाचवण्यासाठी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘मरण आलं तरी चालेल, पण हा लढा थांबता कामा नये,’ असं म्हणत त्यांनी स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. झाडं वाचवण्यासाठी चिपको आंदोलनासारखा मार्ग स्वीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलं. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.

प्रकल्पावरून संघर्ष वाढण्याची शक्यता

टोरंट पॉवरच्या प्रस्तावित प्रकल्पावरून स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं समोर येत आहे. झाडतोडीमुळे जंगल, जैवविविधता आणि परिसरातील पर्यावरणावर परिणाम होण्याची भीती आंदोलक व्यक्त करत आहेत.

आता या प्रकल्पाबाबत सरकार आणि संबंधित कंपनी काय भूमिका मांडतात, तसेच स्थानिकांच्या हरकतींवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात समतोल राखण्याची मागणी या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे.

Satej Patil News: अल निनोचे कारण सांगता अन् निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प आणता; सतेज पाटलांचा पलटवार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आदित्य ठाकरे यांनी साय डोंगरातील वृक्षतोडीला विरोध का केला?

    Ans: कर्जत-भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जाण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

  • Que: साय डोंगरातील वृक्षतोडीचा वाद कोणत्या प्रकल्पावरून सुरू आहे?

    Ans: हा वाद टोरंट पॉवर कंपनीच्या प्रस्तावित जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पाशी संबंधित आहे. प्रकल्पासाठी किती झाडे तोडली जाणार आहेत, याबाबत स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीचा दावा केला जात आहे.

  • Que: आदित्य ठाकरे यांनी सरकारला काय इशारा दिला?

    Ans: ‘मरण आलं तरी चालेल, पण हा लढा थांबणार नाही,’ असं म्हणत त्यांनी वृक्षतोडीविरोधातील आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Web Title: Aaditya thackeray slams cm devendra fadnavis overtree cutting karjat bhimashankar vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • CM Devendra Fadnavis
  • shivsena

संबंधित बातम्या

Hinjawadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्घाटनाशिवाय तातडीने सुरू करा; आदित्य ठाकरेंचा सल्ला
1

Hinjawadi Shivajinagar Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो उद्घाटनाशिवाय तातडीने सुरू करा; आदित्य ठाकरेंचा सल्ला

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर
2

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना ओपन चॅलेंज! ‘ऑडिओ क्लिपचं सत्य शोधून दाखवा…’
3

Manoj Jarange Audio Clip Row : जरांगेंचं फडणवीस आणि शिंदेंना ओपन चॅलेंज! ‘ऑडिओ क्लिपचं सत्य शोधून दाखवा…’

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी
4

NCP Ajit Pawar : अर्थखात्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक! 500 कोटींच्या ऑडिओवरून भाजप-शिंदेगटात वाद सुरू असतानाच राष्ट्रवादीची नवी खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.