
Photo Generate AI
शेतकऱ्यांना कोण त्रास देत असतील तर त्यांची पोलीस स्थानकात तक्रार करवी, असे स्पष्ट आदेश सरकारने दिले असून सुद्धा मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून हप्ते वसुली करत आहे.
अपुऱ्या पावसामुळे आणि पिके वाया गेल्याने जालना जिल्ह्यातील घनसावंगी, अंबड, परतूर व इतर भागांतील शेतमजूर महिलांसमोर हाताला काम नसून जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकी कडे उत्पन्न बंद असताना, दुसरीकडे मायक्रोफायनान्स व खासगी वित्त कंपन्यांचे कर्मचारी कर्जाच्या हप्त्यांसाठी महिलांवर दबाव टाकत आहेत.
अंबड तालुक्यात कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याने एका 60 वर्षीय वृद्धाला व कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करत घरात येऊन दमदाटी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मायक्रोफायनान्स कंपनी वाले येतात आणि आम्हाला त्रास देतात. दुष्काळ परिस्थिती असल्याने आम्हाला काम मिळत नाही, छोट्या दुकानासाठी पैसे घेतले होते.पण दुष्काळ परिस्थिती असल्याने आता दुकान सुद्धा बंद ठेवले आहे. असे महिला शेतकऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास व मागे तगादा लावून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मुजोर मायक्रोफायनान्स व खासगी वित्त कंपन्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश शेतकऱ्यांना दिले आहेत.