
Eknath Shinde
जालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (सोमवार, 11 नोव्हेंबर) जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करत त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. मात्र, शिंदेंच्या दौऱ्याची तयारी सुरू असतानाच जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुकाप्रमुखांसह पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. (Eknath Shinde)
जालना जिल्ह्यातील मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघात ही राजकीय घडामोड घडली आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षात काम करताना पदाधिकाऱ्यांना योग्य स्थान दिलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हाप्रमुखांकडून पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षाचे कार्यक्रम घेतले जात असल्याची नाराजीही राजीनाम्यांमागे असल्याचं सांगितलं जात आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आसाराम बोराडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरून पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचा दावा केला जात आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या सामूहिक राजीनाम्यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्याला भेट देणार आहेत. मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे ते दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी आणि व्यथा जाणून घेणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी केली होती. आता शिंदेही शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणार आहेत.
मात्र, एकीकडे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याची तयारी आणि दुसरीकडे पक्षातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अशा दुहेरी घडामोडींमुळे एकनाथ शिंदेंच्या जालना दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीत खदखद नेमकी आहे तरी कसली? पक्षाचे नेतेमंडळी झाले सैरभैर
Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी एकनाथ शिंदे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Ans: मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षाचे कार्यक्रम घेतले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
Ans: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना जिल्ह्यातील मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.