Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जामखेड – खर्डा रस्ता बनला मृत्यूचा सापळा; तात्पुरती मलमपट्टी, अतिवृष्टीची झळ बसली राज्य मार्गाला

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यांची दुरवस्था आहे आणि यामध्येच जामखेड खर्डा रस्त्याचाही त्रास दिसून येत आहे. या मार्गाचा अक्षरशः मृत्युचा सापळा तयार झाला आहे, ज्यावर अनेक अपघात होत आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 03, 2025 | 12:34 PM
जामखेडच्या रस्त्याची दुरवस्था

जामखेडच्या रस्त्याची दुरवस्था

Follow Us
Close
Follow Us:
  • जामखेड तालुक्यात महामार्गाची दुरवस्था
  • शिर्डी-हैदराबाद महामार्ग खराब
  • पावसामुळे पडलेत चरे 

अहिल्यानगर/वसंत सानप: जामखेड तालुक्यातून जाणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या शिर्डी- हैद्राबाद महामार्गाची दुरवस्था झाली आहे. जामखेड तालुक्यातील खर्ड्यापर्यंतचा रस्ता दुरावस्थेच्या विळख्यात सापडला असून ‘ मृत्यूचा सापळा’ बनला आहे. अतिवृष्टी व गेली वर्षभरापासून वेळी अवेळी झालेल्या पावसामुळे रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग अनेक ठिकाणी उखडला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने साईड पट्या उखडून चर पडले आहेत मुख्य रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाची रुंदी कमी जागोजाग घडलेल्या खेड्यांमुळे प्रवाशांचे कोरड मोडले आहे. तर चालकांना येथून प्रवास करताना जीव घेणी कसरत करावी लागत आहे. ‘संगमेश्वर पुला’ च्या दरम्यान तर रस्ता धोकेदायक बनलेला आहे. तसेच गोलेकर लावणात पांढरेवाडी फाट्याजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात दररोज अपघात होताहेत.

खर्डा जामखेड रस्यादरम्यान केवळ साडेतीन किलोमीटर अंतराचा रस्ता चांगला असून उर्वरित साडेसहा किलोमीटरचा रस्ता अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने खराब झालेला आहे. सदरच्या रस्त्यादरम्यान खड्डे भरण्याचे कामाचे टेंडर खुले झाले असून याकरिता 67 लाख रुपये रक्कम मंजूर आहे व हे काम सागर कार्बो लिमिटेड या कंपनीला मिळालेले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली आहे – शशिकांत सुतार, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामखेड

अहिल्यानगर शहरात दोन वेळा होणार स्वच्छता! स्वतः आमदार संग्राम जगताप स्वच्छतेसाठी उतरेल रस्त्यावर

तालुक्यासाठी महत्वाचा मार्ग असूनही झाले दुर्लक्ष

खर्डा आणि जामखेड ही तालुक्यातील महत्वाची गाव आहेत. या दोन्ही गावांच्या भोवती संपूर्ण तालुका केंद्रित झालेला आहे. प्रशासकीय व सामाजिक सुविधांसाठी या दोन्ही गावांर तालुक्यातील ग्रामस्थ आधारभूत आहेत. या सर्वांना प्रवासासाठी खर्डा- जामखेड हा प्रमुख मार्ग आहे, या मार्गावर खर्डा किल्ला आहे, त्यामुळे या रस्त्याचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढले आहे. तसेच श्री. क्षेत्र सिताराम गड, श्री क्षेत्र गीतेबाबा समाधीस्थळ आणि बारा प्रतिज्योर्तिलिंग मंदीर याच भागात आहेत, त्यामुळे पंचक्रोशीतून व शेजारच्या तालुक्यातील भाविक भक्तांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. तसेच स्थानिक, शेतकरी, गावकरी इत्यादीच्या व्यवसाय व व्यवहारासाठी मार्गाचा उपयोग होतो.

प्रवासाला दुप्पटचा वेळ जात आहे खर्ची

जामखेड – खर्डा भूम – पार्टी – राज्य मार्ग लेखाशिर्ष -५७ अंतर्गत जामखेड तालुक्यात रस्ता हद्द २२ किलोमीटर आहे. हा मार्ग मुख्यतः जिल्हा मुख्यालय किंवा जिल्ह्यांमधील ग्रामीण भागाशी जोडणारा रस्ता आहे. या मार्गासाठी पुरवलेल्या योजनांमध्ये “विस्तार व सुधारणा” ही कामं आहेत. या रस्त्यावर प्रवासाचा कालावधी अंदाजे २५ ते ३० मिनिटे असा आहेत मात्र प्रत्यक्षात हा प्रवास करण्यासाठी दुप्पटचा वेळ खर्ची घालावा लागतो शिवाय प्रवास सुरक्षित होईलच असे नाही.

Ahilyanagar News: ‘या’ गावात भोंगा वाजला की 2 तास मोबाइल बंद! विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आदर्श उपक्रम

अन्य राज्य व जिल्ह्यासाठी महत्वाचा मार्ग नादुरूस्त

नाशिक, नगर व बीड जिल्ह्यातील भक्तगण श्री क्षेत्र तुळजापूरला आंबा मातेच्या दर्शनाकरिता उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातील भवकभाण या रस्त्यावरुन श्री क्षेत्र शिर्डीला येतात; जामखेड तालुक्यातून जाणाऱ्यां रस्त्याच्या दुरावस्थेचा भाविक भक्तांना मोठा त्रास सोसावा लागतो. ही दुरावस्था हटवावी याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागाने खड्डे बुजविण्याची उपाययोजना हाती घेतली आहे: प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली मात्र कायमस्वरूपी अडचण सुटावी याकरिता नव्याने संपूर्ण रस्त्याचे काम करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Jamkhed kharda road becomes a death trap temporary bandage heavy rains hit state highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Road Safety

संबंधित बातम्या

भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका! आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी
1

भोकरदनमध्ये अवकाळी पावसाचा फटका! आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांसह केली पाहणी

Wada News: विविध पक्षांचे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल; स्थानिक निवडणुकीची लगबग सुरू
2

Wada News: विविध पक्षांचे कार्यकर्ते शिंदे गटात दाखल; स्थानिक निवडणुकीची लगबग सुरू

Ahilyanagar : मनपा निवडणूक; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचा ‘पॉवर शो’, विक्रमी उमेदवार अर्ज
3

Ahilyanagar : मनपा निवडणूक; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचा ‘पॉवर शो’, विक्रमी उमेदवार अर्ज

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा
4

तुम्हाला डिजिटल अरेस्ट झाली! अहिल्यानगरच्या अभियंत्याला घातला 9 लाखांचा गंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.