Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Javali Khair Tree Cutting: जावळीत दुर्मिळ खैर वृक्षांची राजरोस कत्तल; वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष? वृक्षप्रेमींमधून संताप

जावळी तालुक्यातील सांगवी शिवारात शेकडो दुर्मिळ खैर वृक्षांची अवैध कत्तल झाली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाकूड माफियांचे फावले असून वृक्षप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 08:25 PM
Javali Khair Tree Cutting: जावळीत दुर्मिळ खैर वृक्षांची राजरोस कत्तल; वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष? वृक्षप्रेमींमधून संताप
Follow Us
Follow Us:

 

  • जावळीत दुर्मिळ खैर वृक्षांची राजरोस कत्तल
  • वनविभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
  • वृक्षप्रेमींमधून संताप
मेढा : तालुक्यात कुसुंबी, केळघर या पट्ट्यात दुर्मिळ खैर जातीचे वृक्ष आढळतात. मात्र या वृक्षांवर कोकणातील व्यापाऱ्यांचा डोळा राहिल्याने दरवर्षी एप्रिल मे महिन्यात हजारो दुर्मिळ खैर झाडांची कत्तल तालुक्यात केली जाते. अशीच शेकडो दुर्मिळ खैर झाडांची कत्तल तालुक्यातील सांगवी जवळच्या शिवारात झाली असून, वनविभाग मात्र सुस्त दिसून येत आहे. त्यामुळे सांगवीतील वृक्षतोडीचा रीतसर पंचनामा व्हावा अशी मागणी वृक्ष प्रेमीमधून होत आहे.

वनपरिक्षेत्रअधिकाऱ्यांचा ओल्या पार्ट्यावर जोर

जावळीचा वनपरिक्षेत्र अधिकारी चार्ज हा गेली वर्षभरापासून सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप झोपळे यांच्याकडे आहे. झोपळे सातारा कार्यालयात बसून तालुक्याचा कारभार हाकत आहेत. मात्र रात्रीच्या ओल्या पार्ट्यांना ते आवर्जून हजेरी लावताना काही गावांमध्ये दिसून येत आहेत.मग कुणाची यात्रा असो किंवा वाढदिवस पार्टी असो ते हजेरी लावतातच. प्रत्यक्षात वन विभागात वन विभागाच्या कामकाजात लक्ष कमी मात्र इतर गोष्टींमध्ये त्यांचा अधिक अधिक रस दिसून येत आहे. त्यामुळेच सांगवी येथील शेकडॊ खैर तोडून देखील सोयीस्करित्या दुर्लक्ष केले गेले आहे.

मध्यंतरी आसनी येथे वनविभागाने पंचनामा केलेले खैर लाकूड चोरीला गेले, तर कुसुंबी येथील वनहद्दीत राजरोसपणे साग झाडांची कत्तल अज्ञाताकडून करण्यात आली. तरी देखील वनविभाग निद्रित अवस्थेत दिसून येत आहे.अशा घटना घडूनही नेमका झोपळे यांना जावळी तालुक्याचा प्रभारी चार्ज देण्या पाठीमागचा उद्देश वरिष्ठांचा कोणता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Satara: तासवडे टोलनाक्यावर संतापाचा स्फोट; माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे चक्काजाम आंदोलन, प्रशासनाला इशारा

सांगवी गावच्या हद्दीत शेकडो खैर तोडलेले असताना देखील कागदोपत्री ठराविक वृक्ष दाखवून पंचनामा केला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या ठिकाणी शेकडो खैर तोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे वन विभागाने तात्काळ येथील तोडण्यात आलेल्या बुंदयांप्रमाणे वृक्ष मोजून कारवाई करावी अशी मागणी वृक्ष प्रेमींमधून होत आहे.

खैर दुर्मिळ प्रजातीमध्ये गणला जातो

खैरवृक्ष हा दुर्मिळ प्रजातींमध्ये गणला जातो. त्यामुळे हा खैर तोडण्यासाठी कोणतीही परवानगी वन विभागाकडून दिली जात नाही. मात्र हा खैर पान सुपारी, पान मसाला, गुटखा या वस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो, त्यामुळे चिपळूण सह कोकणात याला मोठ्या प्रमाणात मागणी राहते, व कोकणातूनच तालुक्यातील खैर सिंडिकेट वन विभागाच्या मदतीने चालवले जाते. त्यामुळे दुर्मिळ प्रजातीत खैर गणला जाऊन देखील राजरोसपणे याची तोड जावळी तालुक्यात होताना पाहायला मिळते.

New Khambatki Tunnel: खंबाटकी बोगदा चाचणीसाठी खुला; पुणे–सातारा प्रवास होणार अधिक जलद आणि सुरक्षित

Web Title: Javali khair tree smuggling forest department negligence sangvi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी
1

कराड उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण नसतानाही खुला करण्याची घाई; पालकमंत्र्यांची नाराजी

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2

‘मराठ्यांना फसवाल तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल’; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
3

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
4

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.