Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Someshwar Factory Election Baramati: आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं!; बारामतीत जय पवारांचा घणाघात

Jay Pawaron Someshwar Factory Election Baramati: काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 08, 2026 | 02:24 PM
Jay Pawar, Baramati News, Someshwar Sakhar Karkhana, Ajit Pawar,

Jay Pawar, Baramati News, Someshwar Sakhar Karkhana, Ajit Pawar,

Follow Us
Follow Us:
  • सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांनी सर्वांना डावलल्याच्या जय पवारांचा आरोप
  • माळेगाव सहकारी साखर कारखाना २ कोटी रुपये नफ्यात असल्याचा दावा
  • दादांच्या विचारसरणीवर चालत शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठी काम करत राहणार
Baramati Politics: “शेवटच्या दिवसापर्यंत मला वाटत होतं की आपण सगळे एकत्र बसून काहीतरी मार्ग काढू. पण पुरुषोत्तम जगतापांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दादांचं कुटुंब म्हणजे आपण सगळेच आहोत. मात्र, आम्हा सगळ्यांना पुरुषोत्तम जगतापांनी डावललं,” असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केला. तसेच माळेगाव कारखान्यातील तोट्याच्या मुद्द्यावरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका; सभासद सर्व सत्य जाणतात, माळेगाव कारखाना दोन कोटी रुपये नफ्यात आहे,असे जय पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जय पवार यांनी स्व. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या राजकीय वाटचालीबाबतही भूमिका स्पष्ट केली.

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे

“दादांचा अपघात झाला, त्यावेळी त्यांच्याजवळ जनतेच्या कामांचीच कागदपत्रं होती. शेवटच्या क्षणापर्यंत ते जनतेसाठीच काम करत होते. दादा गेल्यानंतर मी खूप विचार केला. राजकारण सोडावं, आईला वेळ द्यावा, असंही मनात आलं होतं. पण त्या १३ दिवसांत दादांवर जनतेचं किती प्रेम आहे, हे आम्ही जवळून पाहिलं. त्यानंतर ठरवलं की शेवटच्या क्षणापर्यंत जनतेसाठीच काम करायचं,” असं जय पवार (Jay Pawar) म्हणाले.

“आपण दादांचे वारस आहोत. त्यांचं रक्त आपल्या शरीरात आहे. त्यामुळे जनतेसाठी जगायचं आणि दादांनी आयुष्यभर जपलेला जनसेवेचा विचार पुढे न्यायचा, हा आमचा निर्धार आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

एकत्र येण्याची चर्चा

काही दिवसांपूर्वी सुप्रिया आत्यांच्या घरी बहिण रेवतीला भेटण्यासाठी गेलो असताना सोमेश्वर कारखाना निवडणुकीबाबत एकत्र येण्याची चर्चा झाली होती, अशी माहिती जय पवार यांनी दिली. “युगेंद्र पवार यांनीच सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का, अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी पार्थदादांनी स्पष्ट सांगितलं की, ‘युगेंद्र, आमचे कार्यकर्ते आम्हाला असं करू नका, असं सांगत आहेत. हे कार्यकर्ते आमच्यासाठी झटतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं ऐकावं लागतं.’ त्यानंतरही आम्ही शेवटपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा ठेवली होती,” असं जय पवार यांनी सांगितलं.

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर,

‘माळेगाव कारखाना ७० कोटींच्या तोट्यात असल्याचा दावा; जय पवारांचा पलटवार’

माळेगाव कारखान्याच्या आर्थिक स्थितीवरून युगेंद्र पवार यांनी केलेल्या आरोपांवरही जय पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “दादा गेल्यानंतर माळेगाव कारखान्याचं ७० कोटी रुपयांचं नुकसान झालं, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं. त्यानंतर मी या विषयाची माहिती घेतली. मात्र, कारखाना दोन कोटी रुपयांच्या नफ्यात असल्याची माहिती माझ्यासमोर आली,” असेही जय पवार यांनी स्पष्ट केले.

“निवडणूक लढवायची असेल तर जरूर लढवा; पण वस्तुस्थितीच्या आधारावर लढा. उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू नका. सभासद आणि शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना काय खरं आणि काय खोटं, हे चांगलं कळतं. त्यामुळे सत्य फार काळ लपवता येणार नाही,” असा इशारा जय पवार यांनी दिला.

‘सभासदांचं हित हाच मुख्य मुद्दा’

सोमेश्वर कारखाना हा सभासद आणि शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला कारखाना आहे. त्यामुळे निवडणुकीत वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांपेक्षा सभासदांचं हित, शेतकऱ्यांचा फायदा आणि कारखान्याचा विकास हेच महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली.

 

Web Title: Jay pawar attacks purushottam jagtap over someshwar factory elections as

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • baramati news
  • Jay Pawar

संबंधित बातम्या

‘गेल्या आठ महिन्यांत माळेगाव कारखान्याला 70 कोटींचा तोटा’; युगेंद्र पवार यांचा आरोप
1

‘गेल्या आठ महिन्यांत माळेगाव कारखान्याला 70 कोटींचा तोटा’; युगेंद्र पवार यांचा आरोप

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
2

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
3

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी
4

जगतापांच्या पॅनेलला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा दणका; निवडणुकीत अजितदादांचे नाव, फोटो वापरण्यास बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.