Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माळशिरसमध्ये ‘या’ नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माजी आमदार राम सातपुते यांच्याच नेतृत्वाखाली हाेतील, अशी घाेषणा जयकुमार गोरे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2025 | 02:53 PM
माळशिरसमध्ये 'या' नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

माळशिरसमध्ये 'या' नेत्याच्या नेतृत्वात होणार निवडणुका; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:
  • आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
  • माळशिरसमध्ये राम सातपुतेंच्या नेतृत्वात होणार निवडणुका
  • सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची मोठी घोषणा

माळशिरस : आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरेदेखील वाढले आहेत. अशातच आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी घोषणा केली आहे. माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका माजी आमदार राम सातपुते यांच्याच नेतृत्वाखाली हाेतील, अशी घाेषणा गोरे यांनी केली आहे.

नातेपुते येथील मधूर मिलन मंगल कार्यालयात माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केलेल्या कार्यकत्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब देशमुख, अकलुज भाजपचे मंडल अध्यक्ष सुजय माने पाटील, बाळासाहेब धाईंजे, मिलिंद सरतापे, राजकुमार हिवरकर आदी भाजप व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले की, मी गेले २० वर्षे आमदार व आता मंत्री आहे, मी कोणाच्या वाटेला जात नाही, माझ्या वाटेला कोणी गेलं तर मी सोडत नाही. मी कमरेवर वार करत नाही तर कमरेखाली वार करतो, असे म्हणत माळशिरस तालुक्यातील २२ गावांचा पाण्याचा प्रश्न भाजपच सोडवणार असल्याचा दावा गोरे यांनी केला.

माजी आमदारांचे लवकरच प्रवेश

मंत्री गाेरे म्हणाले, मला एका वर्षाचा हिशोब विचारणाऱ्यांनी ५० वर्षात काय केले, हे अगोदर सांगावे, तालुक्यातील भाजपच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे, हे विसरू नका असा गंभीर इशाराही गोरे यांनी दिला. लवकरच बबनराव शिंदे, दिलीप माने, राजन पाटील, यशवंत माने, रणजितसिंह शिंदे या नेत्यांचे भाजपात प्रवेश होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

माजी आमदार राम सातपुते यांनी विधानसभेला आपल्याला मिळालेली एक लाख आठ हजार मते ही भाजपच्या कार्यकर्त्यांचे बळ असल्याचे सांगितले. मात्र त्यामुळे विरोधकांना बीपीच्या गोळ्या चालू झाल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे बोलताना सातपुते म्हणाले, आपला पालकमंत्री एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारा नाही. आगामी काळात माळशिरस तालुक्यातील अनेक मातब्बर नेत्यांचा अकलूजच्या विजय चौकात भाजप प्रवेश होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेवर भाजपचा, महायुतीचा झेंडा फडकवल्याशिवाय कार्यकर्ते शांत बसणार नाही, असा निर्धार सातपुते यांनी व्यक्त केला.

Web Title: Jayakumar gore has made a big announcement regarding the elections in malshiras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Jaykumar Gore

संबंधित बातम्या

शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश
1

शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली? सचिन सावंतांचा टोला
2

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली? सचिन सावंतांचा टोला

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!
3

Sindhudurg ZP Election: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल; निलेश राणेंचा ३२ जागांवर दावा!

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय
4

अकलूज बसस्थानकात अभूतपूर्व गर्दी; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी गाड्या पाठविल्याने प्रवाशांची गैरसाेय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.