
Jaykumar Gore, Ranjeetsinha Naik Nimbalkar
सोळशी ता कोरेगाव येथे युवाउद्योजक व गावचे माजी उपसरपंच विशाल सोळस्कर यांचा भाजपा मध्ये पक्ष प्रवेश झाला या वेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोनिया गोरे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अमित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य हनमंतराव जगदाळे, पुणे जिल्हा ग्रामीण भाजपचे अध्यक्ष शेखर वढणे, माण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह (सोमनाथ) भोसले, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले माझ्या वडिलांनी या भगच्या पाण्यासाठी वसना व पूर्व भागासाठी वांगना या दोन्ही योजना राबवल्या मात्र त्यानंतर आलेल्या राजकीय नेत्यांनी यात बदल केले. त्यामुळे आज या भागातील अनेक गावात या योजनेचे पाणी मिळालं नाही वसना साठी पूर्वी 0.92टी एम शी पाणी मंजूर होते. त्यानंतर आम्ही 0.52टी एम शी वाढ केली. मात्र असं असूनही हॆ संपूर्ण पाणी उचलले जात नाही या बाबत लवकरच बदल करून या भागातील प्रत्येक गावात पाणी देण्याचा मी शब्द देतो.
यावेळी युवा विशाल सोळस्कर म्हणाले सोळशी कडे विशेष लक्ष द्या या ठीकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण केली जात आहे. या भागात पाणी ही मुख्य समस्या आहे ती सोडवण्यासाठी या भागात विकासाचा महामेरू असलेल अनेक मंत्री आले पण पाणी नाही आले युवकांच्या हाताला आज ही काम नाही अनेक ठीकाणी मजबूत रस्तेनाहीत ही आमची प्रमुख मागणी आहे असे विशाल सोळस्कर म्हणाले.
PM Kisan योजनेचा 24 वा हप्ता येण्यापूर्वी 4 मोठ्या अपडेट! शेतकऱ्यांनो, तात्काळ करा ‘ही’ कामे!