Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरकुल वितरण सोहळ्याच्या निमित्ताने साताऱ्यात भाजपची शक्तिप्रदर्शनाची तयारी

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुलांच्या वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ साताऱ्यात होणार असून, कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून ग्रामीण भागात राजकीय संदेश देण्याची तयारी सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: May 14, 2026 | 08:11 PM
Jaykumar gorhe sees venue of PM Awas Yojana Event

Jaykumar gorhe sees venue of PM Awas Yojana Event

Follow Us
Follow Us:
  • पाच लाख घरकुलांच्या वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ साताऱ्यात होणार
  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
  • पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ३० लाख घरांचे उद्दिष्ट
सातारा, दि. १४ (प्रतिनिधी): पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुलांच्या वितरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ साताऱ्यात होणार असून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपकडून ग्रामीण भागात राजकीय संदेश देण्याची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सैनिक स्कूल मैदानावर हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी सैनिक स्कूल मैदानावरील जर्मन हँगर व इतर सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन, भाजपचे लोकसभा संयोजक सुनील काटकर, विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, राहुल शिवनामी आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला ३० लाख घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील पाच लाख घरकुले पूर्ण झाली असून, त्यांचे वितरण साताऱ्यातून करण्यात येणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली.

Sharad Pawar News: ‘देशातील परिस्थिती गंभीर…’; शरद पवारांची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

या कार्यक्रमासाठी सुरुवातीला ४० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित धरली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानुसार उपस्थिती संख्या १५ हजारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आल्याचा दावा गोरे यांनी केला. जिल्ह्यातील लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी एसटी बसचे नियोजन करण्यात आले असून, सकाळी साडेअकरा वाजता कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाकडे भाजपच्या शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न होणार असून, यामधून पक्ष संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विशेष म्हणजे, सातारा जिल्ह्यातील भाजप संघटनेतील विविध गटांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे घरकुल वितरणाच्या कार्यक्रमाबरोबरच मुख्यमंत्री फडणवीस कार्यकर्त्यांना कोणता राजकीय संदेश देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Politics: मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांपासून, बाईक रॅली, मिरवणुकांपर्यंत…; बचतीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Web Title: Jaykumar gorhe visits pm awas yojana event venue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • PM Awas Yojana news
  • Satara

संबंधित बातम्या

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
1

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
2

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
3

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप
4

Satara Jaykumar Gore : सातारा जिल्हा बँकेत बेकायदेशीर निर्णय?; मंत्री जयकुमार गोरेंचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.