Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून शहराला मिळणार पाणी

जेजुरी शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजना असणार्‍या मांडकी डोहातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्याने जेजुरीचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. मांडकी डोहातील आलेल्या पाण्याचे जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 07, 2024 | 09:54 PM
जेजुरीचा पाणीप्रश्न मिटणार; मांडकी डोहातून शहराला मिळणार पाणी
Follow Us
Close
Follow Us:

जेजुरी : खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीला पिण्याचे पाणीपुरवठा करणार्‍या नाझरे धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने जेजुरी शहराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. जेजुरी शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजना असणार्‍या मांडकी डोहातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आल्याने जेजुरीचा पाणी प्रश्न आता मिटणार आहे. मांडकी डोहातील आलेल्या पाण्याचे जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले आहे.

तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीला नाझरे धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होत होता. २००० मध्ये दुष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने तातडीची मांडकी डोहावरील पाणी पुरवठा योजना सुरु केल्याने त्यावेळी पाणी प्रश्न मिटला होता. यावर्षी नाझरे धरण क्षेत्रात केवळ ३३३ मिलीमीटर पाण्याची नोंद झाली. त्यामुळे धरणात पाणीसाठा होऊ शकला नाही. परिणामी गेली सहा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले होते.

जेजुरी शहराला पर्यायी असणार्‍या मांडकी डोहातील योजना गेली तीन ते चार वर्षांपासून बंद होती. जलवाहिन्या फुटल्या होत्या, वीज बिलाची थकबाकी मोठी होती. शहराला आठवड्यातून केवळ दोन वेळा पाणीपुरवठा होत असल्याने पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले होते. आमदार संजय जगताप, माजी नगरध्यक्षा विना सोनवणे यांच्यासह माजी नगरसेवक यांनी मांडकी डोहातून पाणी मिळावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. आ. जगताप यांच्या प्रयत्नातून थकीत वीजबिलाचा प्रश्न मार्गी लागून सुमारे ४० लाखांचा पहिला वीज बिलाचा हप्ता भरण्यात आला.

मांडकी डोहावर विजेसाठी नवीन डीपी बसविण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून जलवाहिन्याची दुरुस्ती मागील दोन महिन्यात करण्यात आली. मांडकी डोहातून शनिवारी (दि. 6) जेजुरीच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी येण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. यासाठी जेजुरी पालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, पाणी पुरवठा विभागाचे राजेंद्र दोडके, दशरथ कुरुडकर, प्रशांत कुदळे आदींनी सहकार्य केल्याचे सांगण्यात आले.

काँग्रेसच्या वतीने जलपूजन

मांडकी डोह योजनेतून शनिवारी पाणी आल्याने जेजुर नगरपालिकेचे माजी गटनेते सचिन सोनवणे, माजी नगरसेवक महेश दरेकर, रुक्मिणी जगताप, हेमंत सोनवणे, सुशील राऊत, देवसंस्थानचे माजी विश्वस्त पंकज निकुडे, जेजुरी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर, संतोष तोडकर यांच्या हस्ते यावेळी जलपूजन करण्यात आले.

गेली दोन वर्षे जेजुरी पालिकेत प्रशासक असून, सत्ता नसताना देखील जेजुरीकर नागरिक व भाविकांची तहान भागविण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी यांनी सतत ही योजना सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला. आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नांतून मांडकी डोहावरील पाणी योजना सुरु झाली असून जेजुरी शहराला आता चार दिवसांऐवजी सोमवारपासून दोन दिवसांनी पिण्याचे पाणी मिळणार आहे, असे सचिन सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: Jejuris water problem will be resolved the city will get water from mandaki doha nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Congress
  • jejuri
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.