Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राजापूर, हलाल अन् झटका! आव्हाड- राणेंमध्ये विधानसभेत उडाला खटका

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मत्सविकास मंत्री नितेश राणे यांना लक्ष्य केलं.  नितेश राणे त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 24, 2025 | 11:50 PM
राजापूर, हलाल अन् झटका! आव्हाड- राणेंमध्ये विधानसभेत उडाला खटका

राजापूर, हलाल अन् झटका! आव्हाड- राणेंमध्ये विधानसभेत उडाला खटका

Follow Us
Close
Follow Us:

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मत्सविकास मंत्री नितेश राणे यांना लक्ष्य केलं.  नितेश राणे त्यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे मोठे बंधू निलेश राणे उपस्थित होते. त्यामुळे आव्हाड आणि राणे यांच्या जुंपली. मात्र आव्हाडांनी नियमावर बोट ठेवत आपलं भाषण सुरू ठेवलं.

AI in Court : सुप्रीम कोर्टातही होणार आता AI चा वापर; 18 भाषांमध्ये मिळणार निकालपत्र

राजापूरमध्ये झालेल्या वादा बाबत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ज्या राजापूरचं प्रतिनिधीत्व नाथ पै यांनी केलं. ज्या राजापूरचं प्रतिनिधीत्व मधू दंडवते यांनी केलं. अशा राजापूरमध्ये कधीच हिंदू मुस्लीम वाद कुणी पाहीला नाही. असं आव्हाड म्हणाले. त्याच राजापूरमध्ये चार जणांना जावून दर्गा जाळला. याघटनेमुळे गावातले मुस्लीम घाबरले. त्याच वेळी गावातल्या हिंदूनी एकत्र येत आग विझवली. हे खरे हिंदू आहेत असंही ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रा जाळू नका असं म्हणत तुमच्यातला एक मंत्री आहे, त्याची काही जबाबदारी आहे की नाही? असा थेट सवाल त्यांनी केला. त्यांचा रोख नितेश राणे यांच्याकडे होता.

आव्हाडांचा हा हल्ला आमदार निलेश राणे यांच्या वर्मी लागला. त्यांनी आव्हाडांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. एक मंत्री राजापूरमध्ये जे घडलं त्याला जबाबदार आहे असं आव्हाड कसं म्हणू शकतात. त्यांच्याकडे त्याबाबतचे काही पुरावे आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला. शिवाय आव्हाड हे राजापूरचे नाहीत. त्या दिवशी तिथं काय झालं हे त्यांना माहित नाही. सर्व स्थिती ही पहिल्या मिनिटापासून नियंत्रणात होती असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यामुळे मंत्र्यांना जबाबदार कसं धरता येईल असं त्यांनी सांगितलं.

Mumbai High Court : धक्कादायक! हायकोर्टाबाहेरच करणीचे प्रयोग, नारळ, गुलाल, लिंबू, काळी बाहुली अन्…

मात्र आपण कुणाचेही नाव घेतले नाही. शिवाय नियम आपल्याला माहित आहेत असं आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. मंत्र्यांनी कसली शपथ घेतली आहे. ते फक्त कॅबिनेट पुरता मर्यादित आहेत का? त्यांच्यावर बाहेरची काही जबाबदारी नाही का? ते उठतात आणि बाहेर भडकवण्याचे काम करतात असा आरोपही यावेळी आव्हाड यांनी केला. शिवाय हलाल आणि झटका या मटणाचा विषय ही त्यांनी काढला. महाराष्ट्रात किती झटका मटणाची दुकानं आहेत हे सरकार सांगणार आहे का? असा प्रश्न ही त्यांनी केला. मी 365 दिवस चिकन मटण खातो असं ही त्यांनी यावेळी सांगितलं.

Web Title: Jitendra avhad vs nilesh rane dispute on zatka halal meat in vidhan sabha news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 11:50 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Maharashtra Politics
  • nilesh rane

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
3

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा
4

युती होवो अथवा न होवो…नवी मुंबईचा महापौर मीच ठरवणार, वनमंत्री गणेश नाईकांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.