Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar News: नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू! अजित पवारांच्या घरासमोर भानामतीचा प्रकार

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी नवीन रणनीती स्वीकारत विरोधकांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 18, 2025 | 03:35 PM
witchcraft in front of Ajit Pawar's house

witchcraft in front of Ajit Pawar's house

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या  निवासस्थानासमोर अघोरी पूजा
  • रस्त्यावर फोडलेले नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू आणि नैवेद्य अशी सामग्री
  • या कथित भानामतीमुळे परिसरात खळबळ
Ajit Pawar News: राज्याच्या राजकीय वर्तुळात बारामतीच्या राजकारणाची कायम चर्चा होत असते. अशातच बारामती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील त्याच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या घराबाहेर, फोडलेले नारळ, हळद- कुंकू, कापलेले लिंबू, नैवेद्य रस्त्याच्या मधोधम ठेवून ही पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या घराबाहेर अघोरी पुजा केल्याच्या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, ही अघोरी पूजा कुणी केली असावी, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे.

Sanjay Shirsat: बाळासाहेबांचे प्रेम कोणत्याही राजकारण्याकडून मिळणार नाही;

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर असलेल्या रस्त्यावर फोडलेले नारळ, फुले, हळद-कुंकू, कापलेले लिंबू आणि नैवेद्य अशी सामग्री सकाळी नागरिकांच्या नजरेस पडली. सहयोग सोसायटीसमोर करण्यात आलेल्या या कथित भानामतीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच घटनेची चर्चा क्षणार्धात सर्वत्र पसरली.

निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या प्रकारामुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नागरिकांमध्ये विविध तर्क–वितर्कांना पेव फुटले असून, काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूनेच हा प्रकार घडवून आणला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचवेळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने एखाद्याचे तिकीट मिळावे किंवा कोणाचे तिकीट कापले जावे, यासाठीच हा प्रकार रचला गेला का? अशा चर्चांनाही बारामतीमध्ये उधाण आले आहे.

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

माळेगावात कट्टर विरोधकाची अजित पवारांना साथ

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी नवीन रणनीती स्वीकारत विरोधकांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत सहकार क्षेत्रातील कट्टर विरोधक रंजन तावरे यांच्यासोबत अनपेक्षित युती करण्यात आली आहे. या युतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीमध्ये औपचारिक आघाडी झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुयोग सातपुते यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे प्रखर विरोधक म्हणून ओळखले जाणारे रंजन तावरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत हातमिळवणी करत समझोत्याचा मार्ग स्वीकारला आहे. या करारानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नगराध्यक्षपदासह 10 जागांवर तर जनमत विकास आघाडी 7 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

निवडणूक जिंकण्याची क्षमता असूनही राष्ट्रवादी आणि अन्य पक्षांनी उमेदवारी नाकारल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. गावात जातीय अस्मिता, नाराजी आणि गटबाजीचे प्रश्न यंदाही प्रकर्षाने समोर आले आहेत. मात्र राष्ट्रवादीने यावेळी उमेदवार निवड प्रक्रियेत समन्वयाला प्राधान्य देत अनेक प्रभागांत सर्वानुमते उमेदवार दिले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी आणि तणाव मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे. विरोधकांना सामावून घेण्याच्या निर्णयामुळे अनेक प्रभागांमध्ये त्रिकोणी किंवा चुरशीच्या लढती होण्याऐवजी सरळ आणि सुलभ सामना होण्याची शक्यता अधिक आहे.

 

Web Title: Ajit pawar news coconut flowers cut lemon a type of witchcraft in front of ajit pawars house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 03:33 PM

Topics:  

  • ajit pawar news
  • Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
1

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल
2

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?
3

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता ‘या’ ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक
4

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता ‘या’ ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.