Lok Sabha elections are to be fought on self-effort; Jitendra Awhad strongly criticized the opponents
मुंबई: राष्ट्रवादीमधील (Rashtrawadi Congress) संघर्षाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात गेला आहे. काल झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगासमोर अजित पवार गटाने शरद पवार पक्षात मनमानी करत होते, त्यांनी केलेल्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या सुनावणीवर बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) भावूक झाले.
जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं काय?
निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सुनावणीत अजित पवार गटाने शरद पवारांवर गंभीर आरोप केले होते. याच मुद्द्यावर बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. काल निवडणुक आयोगासमोरील युक्तिवादात असा एक मुद्दा असा होता की डोळ्यात पाणी आले. स्वतःची राजकीय लढाई जिंकण्यासाठी शरद पवारांकडे बोट दाखवण्यात आलं. सोडून जायचं होतं तर सांगून जायचं होतं, असं जिंतेद्र आव्हाड यावेळी म्हणाले.
तसेच, ज्यांनी पक्षाला मोठे केले. बोट धरुन राजकारणात आणले, त्यांनाच बाहेर काढत आहेत. असे म्हणत ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे, असं आव्हाड म्हणाले.