Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून नव्या नियमाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 06:30 PM
महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टॅक्सी, रिक्षा, बस चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक

Follow Us
Follow Us:
  • ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय
  • महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणा
  • 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान बंधनकारक
मुंबई : “मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे.” या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मधील नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून, 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात निवेदनाद्वारे दिली.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची आणि समृद्ध मराठी संस्कृतीची भूमी आहे. रोजगाराच्या शोधात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे महाराष्ट्राने नेहमीच खुले मनाने स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्या इतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता डोमिसाईल नसेल तर लायसन्स नाहीच, 1 ऑगस्टपासून…

हा निर्णय कोणत्याही भाषे विरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे वरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबविली आहे.

कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या सहकार्याने हजारो अनुभवी शिक्षकांची फळी तयार करण्यात आली. राज्यभरातील विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये, प्रशिक्षण केंद्रे तसेच चालकांच्या सोयीच्या वेळेनुसार व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या प्रशिक्षणासाठी दैनंदिन सेवेत उपयुक्त ठरणारी वाक्यरचना, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, ठिकाणे, भाडे, आपत्कालीन प्रसंग तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सोप्या पुस्तिका, संवाद माला आणि प्रशिक्षण साहित्याच्या माध्यमातून मराठी शिकणे सहज, सोपे आणि आनंददायी व्हावे, यावर विशेष भर देण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा; मात्र महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान होय,” असा संदेश या निर्णयाच्या अंमलबजावणीतून दिला जात असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे भाषिक स्वाभिमान, प्रवासी सुरक्षा आणि दर्जेदार सार्वजनिक सेवा यांचा सुंदर संगम घडेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, शासनाकडून आवश्यक प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल. सर्व व्यावसायिक चालक, वाहन मालक, परिवहन संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवून महाराष्ट्र अधिक सुसंवादी, सुरक्षित आणि मराठीमय करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या अमर ओळींनी सभागृह भारावून गेले—
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी…
जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…
धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी…
एवढ्या जगात माय, मानतो मराठी…
या कवितेतील भावने प्रमाणेच, व्यवहारिक मराठीचा हा निर्णय केवळ एका नियमाची अंमलबजावणी नसून महाराष्ट्राच्या अस्मितेला, आपुलकीला आणि सर्वसमावेशक संस्कृतीला अधिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

‘लालपरी’ची ज्ञानयात्रा, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना एसटीचे सुरक्षित पंख! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Practical marathi mandatory for commercial drivers maharashtra from 16 august 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Auto
  • maharashtra
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई
1

गणेश भक्तांना लुटणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या; फरासखाना पोलिसांची उत्तर प्रदेशात मोठी कारवाई

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार
2

Gondiya News: १०८ रुग्णवाहिकेचा ३ लाख रुग्णांना लाभ! रुग्णांना मिळाली तातडीची मदत, गोंदियात आपत्कालीन रुग्णवाहिकासेवेचा विस्तार

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार
3

अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली तरुणीकडून 50 हजार उकळले, नंतर…; पुण्यातील प्रकार

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये
4

Jalgaon Dal Price Hike: सणासुदीत खिशाला मोठी कात्री! डाळी महागल्या, मठानेही गाठले १८० रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.