Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून रस्ते आणि पूल खचल्याने १६ गावांचा संपर्क तुटला आहे. भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून चार दिवसांपासून वीजपुरवठा व मोबाईल नेटवर्क खंडित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 08, 2026 | 03:00 PM
१६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद...; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

१६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद...; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Follow Us
Follow Us:
  • साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
  • कांदाटी खोऱ्यातील १६ गावांचा संपर्क तुटला
  • दरडी, पूल खचले, भातशेतीचे मोठे नुकसान
  • चार दिवसांपासून वीज, नेटवर्क बंद, १६ गावे वेगळे पडली
कास पठार: सातारा जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम व संपर्कापासून कोसो दूर असलेल्या कांदाटी खोऱ्यातील नागरिकांच्या वेदनेचा महापूर थांबायचे नाव घेत नाही. जनसुविधांचा हरताळ, मूलभूत सुविधांची कमालीची वानवा त्यातच वर्षानुवर्षे आपत्ती झेलत निसर्गाच्या प्रकोपाशी दोन हात करत कशीबशी जगणारी इथली भाबडी जनता गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या महाप्रलयात पुरती भेदरली आहे.
सततच्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे व दरडी कोसळल्या असून रस्ते आणि काही पूलही खचले आहेत. परिणामी कांदाटी खोऱ्यातील तब्बल १६ गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

दरम्यान शिंदी, वलवण, चकदेव, आरव, पर्वत, मोरणी, म्हाळुंगे, उचाट, सालोशी, कांदाट, बन, वाघावळे, लामज, निवळी, आकल्पे आणि पिंपरी या गावांतील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक आव्हानांचा सामना करत केलेली भातलागवड पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतीमध्ये गाळ साचल्याने हंगाम धोक्यात आला आहे.

Satara Rain News: सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम! कोयना धरणात ३५.७१ टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

कोकणाला जोडणारा उचाट–शिंदी–रघुवीर घाट मार्गावर अनेक ठिकाणी दरडी आणि झाडे कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा आणि मोबाईल नेटवर्कही खंडित असल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. सर्वात मोठी अडचण विजेची असून वीज गायब झाल्याने या भागात फक्त बीएसएनएलचे टाॅवर आहेत. वीज खंडित झाल्याने मोबाईल टॉवर बंद पडले असून लोकांना बाहेरील जगाशी संपर्क करणे अडचणीचे ठरत आहे.

कांदाटी खोऱ्यातील सोळा गावे सातारा जिल्ह्यात असली तरी त्यांचे बाजारपेठ, शाळा, दवाखाना आदी सुविधांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बाजारपेठेशीच संपर्क असतो. गावे सातारा जिल्ह्यात पण सुविधा रत्नागिरी जिल्ह्यातील असं या ठिकाणचे जनजीवन आहे. पावसामुळे रघुवीर घाट बंद झाल्यास या लोकांची गैरसोय होते. अतिशय दुर्गम भागातील जीवन अत्यंत कठीण मानले जाते. भारतातील सर्वात पाऊस येथील शिंदी, लामज परिसरात होतो. त्यामुळे येथील जनजीवन मोठ्या पावसात पूर्णपणे ठप्प होते.

सातारा शहरातही पावसाची संततधार आहे. त्यामुळे लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. साताऱ्यासह वाई, जावळी, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. पावसामुळे पाटण तालुक्यातील पाबळ नाला धबधबा या ठिकाणी रस्ता खचला आहे.

Satara News : केळघर येथील रामजीबुवापूलावरील वाहतुक पूर्ववत! बांधकाम विभागाकडून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी

Web Title: Satara kandati valley heavy rain 16 villages cut off landslides farm loss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • maharashtra
  • Monsoon Update
  • Satara

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.