Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांची ही टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. बंडखोरीनंतर ही निवडणूक असल्यामुळे अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी चुरशीची लढत झाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 03, 2024 | 05:39 PM
अजित पवारांची ही टोळी पाकीटमाऱ्यांची टोळी; आमदाराची जिव्हारी लागणारी टीका
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अर्ज छाननी प्रक्रिया सुरु असून अर्ज मागे घेण्यासाठी अवधी दिला गेला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार की पुन्हा महायुती सरकार येणार याची उत्सुकता लागली आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीची विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे यामध्ये प्रत्येक पक्षातील दोन गटामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी शाब्दिक चकमक सुरुच आहे. आता शरद पवार गटाच्या नेत्यांने अजित पवार गटाला पाकिटमार टोळी असे म्हटले आहे.

हे देखील वाचा : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद; शरद पवार यांचा गंभीर आरोप

शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड हे आपल्या आक्रमक बोलीसाठी ओळखले जातात. जितेंद्र आव्हाड हे नेहमी परखडपणे आपले मत मांडताना दिसतात. आता पुन्हा एकदा आव्हाडांनी आपली तोफ अजित पवार गटावर डागली आहे. ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा होता. पण एके दिवशी अजित पवार येतात आणि धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढतात.  जाताना त्यांच्याकडील घड्याळ देखील हिसकावून नेतात. ही चोरांची टोळी आहे. अजित पवारांची ही टोळी पाकिटमार आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपला रोष व्यक्त केला.

हे देखील वाचा : “मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंनी केली स्वतःची शिवरायांसोबत तुलना

जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना थेट आव्हान देखील दिले. भाषणामध्ये बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, या अशा चोरांच्या टोळीपासून सावध रहा. अजित पवारांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी. तुमच्यात हिंमत होती , अजित पवार मर्द की औलाद होते तर म्हणाले असते शरद पवारांनी तुतारी निशाणी घेतली. मीही दुसरं चिन्ह घेऊन लढतो असं म्हटलं असतं तर आपण त्याला मर्द म्हणतो. तुम्ही तर तुमच्या काकाने देशात वाढवलेली पार्टी ती चोरून माझी पार्टी पार्टी म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव काय आहे हे माहीत आहे, असा गंभीर शब्दांमध्ये घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

अजित पवारांची बारामतीकरांना साद

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे बारामती दौरा करत असून विविध गावांना भेटी देत आहेत. तसेच मतदारांना आवाहन देखील करत आहेत. अजित पवार यांनी बारामतीकरांना भावनिक साद घातली आहे. अजित पवार म्हणाले की, “लोकसभेला जर सुप्रिया पडली असती तर साहेबांना या वयात कसं वाटलं असतं, म्हणून तुम्ही सुप्रियाला मतदान केलं. त्यामुळे आता विधानसभेला तुम्ही मला मतदान करा. लोकसभेला साहेबांना खुष केलं आता मला पण खुष करा. साहेब साहेबांच्या परीने विकास करतील मी माझ्या पध्दतीने तालुक्याचा विकास करेल,” अशी साद अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.

Web Title: Jitendra awhad target ajit pawar for ncp sign and name before vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2024 | 12:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
2

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण
3

NCP मध्ये नवे सत्तासमीकरण! फक्त राज्यसभा सदस्य की पक्षातील नवी ताकद? NCP मध्ये पार्थ-जय पवारांवर चर्चांना उधाण

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
4

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.