रावसाहेब दानवे व अब्दुल सत्तार यांच्यामध्ये राजकीय वादंग सुरु आहे. (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून सभांचे सत्र वाढले आहे. या सभांमधून नेत्यांवर आरोर प्रत्यारोप केले जात आहेत. त्याचबरोबर टीका टिप्पणी देखील वाढली आहे. अनेक महिला नेत्यांना देखील खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. आता ही टीका इतिहासातील संदर्भावर दिली जात आहे. रावसाहेब दानवे व अब्दुल्ल सत्तार यांच्यामध्ये वादंग निर्माण झाला आहे. रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.
महायुतीमधील दोन नेत्यांमध्ये वादंग सुरु आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल्ल सत्तार यांनी महायुतीच्या इतर मित्रपक्षाला इशारा दिला होता. जर महायुतीधर्म पाळला गेला नाही तर, मी महायुती धर्माविरोधात फटाके फोडेल, असा इशारा अब्दुल सत्तार यांनी भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांना दिला होता. यावर आता रावसाहेब यांनीही सत्तार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. या दोन नेत्यांमधील वादामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. तसेच रावसाहेब दानवे यांनी स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराज तर अब्दुल सत्तार यांची तुलना औरंगजेबसोबत केली आहे.
हे देखील वाचा : मी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार पण…; सदा सरवणकर यांच्या अटीने वाढला माहिमचा पेच
एका वाहिनीला मुलाखत देताना राबसाहेब दानवे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, “अब्दुल सत्तार काय बोलतात ते सोडा, औरंगजेब काय बोलतो, ते मला शिवाजीला कशाला विचारता? मी शिवाजी आहे, आणि तो (अब्दुल सत्तार ) औरंगजेब आहे”, असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या विधानावर अब्दुल सत्तार यांनीही भाष्य केलं. “रावसाहेब दानवेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. अशा चिल्लर व्यक्तीबद्दल बोलण्यात मला रस नाही. शिवाजी महाराज हे राज्याचे नाही, संपूर्ण देशाचा अभिमान आहे. अशा आपल्या राजांचा एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्यांचा मी निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हे देखील वाचा : पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीच्या उमेदवारांना रसद; शरद पवार यांचा गंभीर आरोप
रावसाहेब दानवे यांच्या या विधानामुळे महायुतीमधील मित्रपक्ष व विरोधक देखील नाराज झाले आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावसाहेब दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “रावसाहेब दानवे यांना आमची विनंती आहे की त्यांनी स्वतःची तुलना शिवाजी महाराजांशी करताना आपलं तोंड आरशात बघावं. आपण बोलताना कोणाशी तुलना करतो, याची राजकीय अक्कल त्यांना असली पाहिजे. मी एक शिवप्रेमी म्हणून रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो,” असे ते म्हणाले. तसेच त्यांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी”, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली.