
Joint operation by Gangakhed Police and Local Crime Branch against those transporting ganja
परभणी : जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील गोपा शिवारात अँटोतून अंमली पदार्थांची बहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हा शाखा आणि गंगाखेड पोलिसांनी संयुक्तरित्या छापेमारी करत तब्बल साडे सात किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना गजाआड केले आहे. या प्रकरणी बुधवारी (दि.२६) गंगाखेड पोलिसात गुंगीकारक औषधी द्रव्य जाणि मनोविकारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) व भारतीय न्यायसंहिता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड पोलीस ठाणे हद्दीतील पालम गंगाखेड रस्त्यावा ओहरी बोबडे यांच्या घर परिसरात अंमली पदाथांची अवैध वाहतुक होत असल्याची माहिती मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेला मिळताच पालम-गंगाखेड रसत्यावर गोपा शिवारात सापळा रचण्यात आला होता. काही वेळाने याच परिसरातून एक ऑटोरिक्षा संशयास्पद पध्दतीने जात असल्याचे आढळून आल्याने त्यास पोलिसांनी थांबवून वाहनाची झडती केली. या झडतीत ऑटोरिक्षातून गांजाची किलो ९१० ग्रॅम १ किरो ८९० ग्रॅम, १ किलो ९१० आणि १ किलो ८६० वजनाची एकूण चार पाकिटे मिळून आली. यात किती ५७० ग्रॅम एवढा गांजा मिळून आता ज्याची अंदाजे किंमत २ लाख २५ हजार ७०० रुपये एवढी आहे.
लव्ह मॅरेज झालयं का….? भर सभेत अजित पवारांचा महिला उमेदवाराला सवाल
घटनास्थळावरून अवैध वाहतुकीचा बाज कंपनीचा अॅटो क्र. एमएच २३ एपा ५३९७जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणात आरोपी वहाबखान पठाण (रा.भंडारी कॉलनी गंगाखेड), लेख फक्रोदिन शेख अब्दुल (रा. गौतम नगर गंगाखेड) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिस उपनिरिक्षक चंदनसिंह परिहार यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलिसात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात गंगाखंड पोलिसांचे पोलिस उपनिरिक्षक गंगलवाड हे करत आहे.
पथकात अनेकांचा सहभाग
ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस विवेकानंद पाटील, गंगाखेड पोलिसातील पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, सहायक पोलिस निरीक्षक भारती, पोलिस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, पोलिस उपनिरीक्षक गंगलवाड, पोलिस अंमलदार लक्ष्मण कांगणे, परसराम गायकवाड, दुधाटे, शिंदे, कनके, क्षीरसागर यांच्या पथकाने मिळून केली.
अंतयात्रा काढली..घाटावर चिता पेटणार एवढ्यात…; समोर आला 50 लाखांचा डाव, Video Viral
लाँडीतील कपड्यांमधील पैसे केले परत
पाथरी शहरात बुधवारी सकाळी घडलेली एक छोटीशी पण हृदयाला स्पर्शन जाणारी घटना प्रामाणिकतेचा सुंदर आदर्श ठरली आहे. साई लाँड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या पॅन्टची तपासणी करताना दुकानदार शाम टोके यांच्या हाताला अचानक जड वस्तू लागल्याची जाणीव झाली. बारकाईने पाहिले असता पॅन्टच्या खिशात पैशांचे एक बंडल दडलेले आढळले. कुतूहल म्हणून त्यांनी त्या बंडलातील नोटांची मोजणी केली असता त्यात अंदाजे १० ते १५ हजार रुपये असल्याचे लक्षात आले. कोणाच्याही नजरेत न येता हे पैसे स्वतःकडे ठेवणे सहज शक्य होते; परंतु पैशांपेक्षा प्रामाणिकपणाला आग्रक्रम देणाऱ्या टोके यांनी एक क्षणही विलंब न लावता ते पैसे सुरक्षित ठेवले. यानंतर त्यांनी संबंधित ग्राहकाला संपर्क करून दुकानात बोलावले, ग्राहक समोर आला तेव्हा टोके यांनी शांतपणे संपूर्ण घटना सांगितली आणि सर्व पैसे जसाच्या तसा परत केले. हरवलेले पैसे सुरक्षित मिळाल्याने ग्राहक भावूक झाला व टोके यांचे मनापासून आभार मानले. घटना शहरभर आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच शाम टोके यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक सुरू झाले आहे. धकाधकीच्या आणि स्वार्थाच्या काळात अशा नैतिक मूल्यांना जपणारे लोक विरळ झाले आहेत. त्यामुळे टोके यांनी दाखविलेला हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्थानिक नागरिकांनीही याचे स्वागत करत, “अशा प्रामाणिक व्यक्तिमत्त्वांमुळे समाजात सकारात्मकतेचा आणि विश्वासाचा संदेश मिळतो,” अशी भावना व्यक्त केली आहे. साई लाँड्रीचे शाम टोके यांनी प्रामाणिकतेचा दिलेला हा आदर्श निश्चितच अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.