Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या ३६ वर्षांच्या संघर्षाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार; पत्रकार मित्र असोसिएशनचा इशारा

हक्काचा भूखंड द्यावा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी २५ लाख रुपये मोबदला मिळावा यासाठी गेल्या ३६ वर्षांपासून बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. मात्र अद्या त्यांच्या संघर्षाला यश आलं नाही. मात्र आता याप्रकरणी पत्रकार मित्र असोसिएशनने आक्रमक भुमिका घेतली आहे. बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणास बसु असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2024 | 02:21 PM
बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार; पत्रकार मित्र असोसिएशनचा इशारा

बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार; पत्रकार मित्र असोसिएशनचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

सिडको (बीएमटीसी) परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांना हक्काचा भूखंड द्यावा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी २५ लाख रुपये मोबदला देण्याचे आदेश सिडको प्रशासनाला देण्यात यावे, बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या ३६ वर्षांच्या संघर्षाला न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुंटुंबियांसह आमरण उपोषणास बसु असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेतली आणि त्यांना या सर्व मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन दिलं.

हेदेखील वाचा- नाशिकमध्ये 200 फूट खोल दरीत कोसळून टँकरचा भीषण अपघात; 5 ठार, 4 गंभीर जखमी

यासह पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे ३६ वर्षांपासून सुरु असाणाऱ्या बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आता न्याय मिळेल अशी आशा आहे.

पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष भागवत आहिरे यांनी सांगितलं की, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात सिडको परिवहन सेवेतील कामगारांचा न्यायालयीन लढा सुरु होता. त्यावेळी कामगारांचे हित पाहता मंत्री चव्हाण यांनी सत्र कामगारास प्रत्येकी भूखंड देण्याचे आदेश सिडको प्रशासनाला दिले होते. या भूखंडावर व्यवसाय करुन कामगारांचा चरितार्थ व्हावा हा त्या मागचा उद्देश होता. माजी आमदार विवेक पाटील, खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूखंड देण्याचे निश्चित झाले. परंतु कामगारांना देण्यासाठी जमीन उपलब्ध नसुन भूखंड देता येणार नाही अशी भूमिका सिडको प्रशासनाने मांडली.

हेदेखील वाचा- धक्कादायक! लसणाच्या नावाखाली विकल्या जात आहेत सिमेंटच्या पाकळ्या; अकोल्यामधील घटना

प्रत्येक कामगाराला भूखंडाबदल २५ लाख रुपये देण्याचा ठराव कर्मचाऱ्यांच्या बैठकित सर्वानुमते झाला. मात्र सिडकोकडून भूखंड किंवा पैसे यापैकी काहीही मिळाले नाही. याबाबत गेल्या ३६ वर्षांपासून बीएमटीसी कर्मचारी सिडकोकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र सिडको प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेउन शिष्टमंडळाने कैफियत मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ यंत्रणेद्वारे आदेश करावेत आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष भागवत आहिरे यांनी दिला आहे.

शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी सांगितलं की, बीएमटीसी कर्मचाऱ्यांना भूखंडाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून विषय रखडला आहे. याबाबत नगरविकासकडे प्रस्ताव पाठवला आहे, असे स्पष्टीकरण सिडकोकडून मिळाले होते. अद्याप कोणताही लाभ मिळाला नसून वरिष्ठ पातळीवर आमचा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे ३६ वर्षांपासून सुरु असाणाऱ्या बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या संघर्षाला आता न्याय मिळेल अशी आशा आहे.

Web Title: Journalist friends association gave warning to give justice to a 36 year old struggle of bmtc transport workers or go on hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • hunger strike
  • Marathi News

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
2

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
3

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?
4

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.