Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard News : जुन्नर तालुक्यात बिबट्याने अडवली ‘भक्ती’ची वाट…! काकडा आरती भजनासाठी जाण्याऱ्या नागरिकांमध्ये भिती

जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यामुळे बिबट्या-मानव संघर्षाच्या घटना नित्याच्या घडताना दिसत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागात भीती ची वातावरण वाढत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 09:33 PM
A leopard blocked the path of devotees in Junnar taluka…! An atmosphere of fear among citizens going for Kakda Aarti Bhajan

A leopard blocked the path of devotees in Junnar taluka…! An atmosphere of fear among citizens going for Kakda Aarti Bhajan

Follow Us
Close
Follow Us:

The number of leopards has increased in Junnar taluka : जुन्नर तालुका हा बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्या-मानव संघर्षाच्या घटना नित्याच्या झाल्या असून आता ही भीती ग्रामीण भागातील लोकांच्या धार्मिक जीवनावरही परिणाम करत आहे. गावकरी पहाटेच्या वेळी मंदिरात ‘काकडा भजनासाठी’ जाण्यासही घाबरत आहेत, ज्यामुळे गावागावात परिसरामध्ये एक भयवह चित्र निर्माण झाले आहे.

जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही पहाटे ४ ते ५ या वेळेत मंदिरात एकत्र जमून ‘काकडा भजन’ करण्याची जुनी परंपरा आहे. थंडीत किंवा इतर वेळीही पहाटेच्या शांत वातावरणात ग्रामस्थ भक्तीभावाने मंदिरात जातात. मात्र, याच वेळी बिबट्यांची शिकार करण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने, अनेक गावांमध्ये काकडा भजनाला जाणाऱ्या वृद्ध आणि महिलांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पारंपारिक भक्तीच्या मार्गात बिबट्याची भीती मोठा अडथळा ठरत आहे.यामुळे आता गावातील शांतता बिघडली असून, ग्रामस्थ बिबट्याच्या भीतीने एकत्र आल्याशिवाय घराबाहेर पडायला घाबरत आहेत. काही गावांनी तर नाईलाजाने काकडा भजनाची वेळ उशिरा करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे त्यांच्या परंपरेत खंड पडत आहे.

हेही वाचा : पिंपरीत ऐन दिवाळीत महापालिकेची जप्तीची कारवाई; थकबाकीदारांचे धाबे दणाणले

वन विभागाला अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे

दरम्यान बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीमधील वाढत्या संचारामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ग्रामस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वन विभागाला अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सातत्याने जागरूकता मोहिम वनविभागाकडून वेळोवेळी राबविण्यात येत आहे. तरी पण पहाटेच्या वेळी, विशेषतः भजनाच्या वेळेस, गावात आणि मंदिर परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. जुन्नरमधील ही परिस्थिती केवळ वन्यजीव आणि मानवी संघर्ष दाखवत नाही, तर लोकांच्या रोजच्या जीवनातील लहान-सहान गोष्टींवरही या संघर्षाचा कसा परिणाम होतो, हे स्पष्ट करते.

हेही वाचा : महापालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीला वेग; प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या विभाजनाच्या कामाची सुरुवात

ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण

पहाटेचा बिबट्या आणि काकडा भजनाची वेळ दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विठ्ठल मंदिरात आणि अन्य देवस्थानमध्ये पारंपारिक काकडा भजनाला सुरुवात होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात मात्र हीच वेळ बिबट्याच्या शिकारीसाठी अत्यंत अनुकूल असते बिबट्या हा प्रामुख्याने पहाटेच्या अंधारात सक्रिय असतो त्यामुळे काकडा भजनासाठी घराबाहेर पडणाऱ्या भक्तांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भजनासाठी मंदिरात जाण्याची इच्छा असूनही, जिवाची भीती बाळगण्याची वेळ आता जुन्नरच्या ग्रामस्थांवर आली आहे.

Web Title: Junnar news leopard creates fear among citizens going for kakda bhajan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 09:33 PM

Topics:  

  • junnar news
  • Leopard
  • Leopard Attack
  • pune news

संबंधित बातम्या

PMRDA News: ‘पीएमआरडीए’च्या ४६ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार
1

PMRDA News: ‘पीएमआरडीए’च्या ४६ भूखंडांची ई-लिलाव प्रक्रिया सुरू होणार

Pune News: लंडनच्या नोकरी प्रकरणात मॉडर्न कॉलेजचा मोठा खुलासा; प्रेम बिऱ्हाडेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
2

Pune News: लंडनच्या नोकरी प्रकरणात मॉडर्न कॉलेजचा मोठा खुलासा; प्रेम बिऱ्हाडेकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा
3

जो आडवा येईल त्याला तुडविणार, तुम्ही पैलवान असलात तरी…; राजू शेट्टींचा इशारा

Pune News :पर्यावरण प्रेमींची वसुंधरा पायी दिंडी ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वाढदिवसानिमित्ताने पायी दिंडीचे प्रस्थान
4

Pune News :पर्यावरण प्रेमींची वसुंधरा पायी दिंडी ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी वाढदिवसानिमित्ताने पायी दिंडीचे प्रस्थान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.