Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कास पठारावरील बांधकामांना हात लावू देणार नाही ; हरित लवादा पुढे वस्तूस्थिती मांडण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन

कास परिसरातील बांधकामे ही स्थानिकांची असून कोणीही दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. पर्यटकांचा वाढता ओघ बघून येथे हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था आली आहे. ज्या व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.

  • By Aparna
Updated On: Jun 03, 2023 | 08:43 PM
कास पठारावरील बांधकामांना हात लावू देणार नाही ; हरित लवादा पुढे वस्तूस्थिती मांडण्याचे शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन
Follow Us
Follow Us:
सातारा : कास परिसरातील बांधकामे ही स्थानिकांची असून कोणीही दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. पर्यटकांचा वाढता ओघ बघून येथे हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था आली आहे. ज्या व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्यांची बांधकामे पॉईंट फाईव्ह प्रमाणे नियमित करण्याच्या संदर्भात मोजणी सुरू आहे. ती तत्काळ पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली. राष्ट्रीय हरित लवादा पुढे कास पठारावरील व्यवसायाची वस्तुस्थिती मांडली जावी, अशी अपेक्षा त्यांनी जयवंशी यांच्याकडे व्यक्त केली.
राष्ट्रीय हरित लवादाने कास पठारावरील बांधकामां संदर्भात चार आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे निर्देश दिले होते. याप्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कास पठारावरील हॉटेल व्यवसायिकांच्या समवेत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची शुक्रवारी त्यांच्या दालनात भेट घेतली. या विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना या संदर्भात हरित लवादा पुढे सकारात्मक बाजू या संदर्भात मांडली जाईल, असे आश्वासन दिले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ज्या समाजसेवकांनी कास पठारावरील बांधकामा संदर्भात तक्रार केली आहे. त्यांनी काही गोष्टी समजावून घ्याव्यात. येथे कोणी कोणाच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. ज्या व्यवसायिकांना नोटीस आलेले आहेत त्यातले ९९ टक्के व्यावसायिक हे स्थानिक भूमिपुत्र असून त्यांनी त्यांच्याच जागेमध्ये ही बांधकामे उभारलेली आहेत. त्या संदर्भातील परवानग्या आणि पॉईंट फाईव्ह प्रमाणे असणारे एफएसआय प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे अामदार भाेसले यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा
या संदर्भात जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी सहकार्य करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, अशी आम्ही मागणी केली होती. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जर पर्यटक येथे चहा, नाष्टा, पर्यटन, मुक्काम या कामांसाठी येत असतील तर येथे स्थानिक पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे, असे अामदार भाेसले यांनी म्हटले अाहे.

पर्यटकांना सुविधा मिळणार
हॉटेल व्यवसाय जर येथे वाढला तरच पर्यटकांना सुविधा मिळणार आहेत, हे समाजसेवकांनी लक्षात ठेवावे. ज्या स्थानिक भूमिपुत्रांचा व्यवसाय वैध आहे, त्यांनी आपली बांधकामे प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. अशा स्थानिक भूमिपुत्रांच्या बांधकामांना अजिबात हात लावू देणार नाही, असा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.

Web Title: Kaas will not touch the constructions on the plateau appeal of shivendrasinharaje to present the situation before harit lavad nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2023 | 08:43 PM

Topics:  

  • Kaas Pathar
  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.