Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: केडीएमटीच्या एसी बसेस बंद; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना नाहक त्रास

डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या एसी बसेस बंद झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा गारेगार प्रवास थांबला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 12, 2025 | 08:10 PM
डीएमटीच्या एसी बसेस बंद; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना नाहक त्रास

डीएमटीच्या एसी बसेस बंद; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना नाहक त्रास

Follow Us
Close
Follow Us:

निष्काळजीपणाचा कळस असलेले प्रशासन आणि बेजबाबदार कंत्राटदार यांच्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. केडीएमटीकडून एसी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती.मात्र हे फक्त एक फसवं आश्वासन असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एसी बसेसची सेवा आता मिळणार नसल्याने प्रवाशांनी खंत व्यक्त केली आहे.

डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या मुजोरीचा सामना करावा लागत आहे.

एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटीला मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत अपयश येत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशनअंतर्गत तब्बल ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून २०७ इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदीचा करणार असल्याचं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सांगण्यात आलं होतं.

मिरा-भाईंदरमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणात मोका अंतर्गत कठोर कारवाईचे आदेश, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून 207 इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी 99 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून केडीएमटीने मे कॉसीस मोबलिटी सर्व्हिसेस आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा 207 बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमताच नसल्याने पहिल्या 10 बसेस बनवतानाच कंपनीला कठीण वाटायला लागलं. पुढील बसेस तयार करण्यास असमर्थता दाखवत कंपनीने कशाबशा 8 बसेस अडीच वर्षाचा विलंब लावत सेवेत आणल्या.

कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला, पण त्यांची तितकी निर्मिती क्षमता नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे .

मोखाडा पोलीसांची धडक कारवाई; सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त, आरोपीला अटक

जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार, प्रवाशांना गारेगार सेवा मिळणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते . पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली . केडीएमटीच्या ताफ्यातकेवळ ८ बस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या. त्यापैकी ४ बस काही महिन्यांतच बंद पडल्या आणि उर्वरित ४ बस विमा नुतनीकरणाच्या फेऱ्यात अडकून शेवटी आगारात उभ्या आहेत.आता सुटे भाग मिळत नाही, विमा भरलेला नाही, बस थांबल्या आहेत अशी कारणे सांगत जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते.

याबाबत केडीएमसीच्या परिवहन विभागाकडून मात्र
“एसी बस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवल्या जात असून बस पासिंग, विमा, पीयूसी यासारख्या गोष्टीची पूर्तता त्यानेच करायची असून विमा पॉलिसी नूतनीकरण करून घेण्याबाबत त्याला कळविण्यात आले आहे. लवकरच नुतनीकरण करून या बसेस रस्त्यावर उतरतील” असं केडीएमटी व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

 

Web Title: Kalyan news kdmts ac buses closed passengers suffer unnecessarily due to administrations negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2025 | 08:09 PM

Topics:  

  • kalyan news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात
1

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती
2

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम
3

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन
4

Nanded : नांदेडमध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वतीने अनंत चतुर्दशी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.