Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News: जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डरमध्ये प्रचंड वादंग, पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात

Kalyan News: शीळ रस्त्यालगत नेकणीपाडा येथे असलेल्या पाच एक जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर शेतकरी आणि बिल्डर यांनी दावा सांगितला आहे. आज बिल्डर त्या जागेवर आला असता त्याला शेतकरी कुटुंबियांनी कडाडून विरोध केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 13, 2025 | 04:53 PM
जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डरमध्ये प्रचंड वादंग, पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात (फोटो सौजन्य-X)

जागेच्या वादातून शेतकरी आणि बिल्डरमध्ये प्रचंड वादंग, पोलिसांनी तीन महिलांना घेतले ताब्यात (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Kalyan News Marathi: कल्याण शीळ रस्त्यालगत नेकणीपाडा येथे असलेल्या पाच एक जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या जागेवर शेतकरी आणि बिल्डर यांनी दावा सांगितला आहे. आज (13 फेब्रुवारी) बिल्डर त्या जागेवर आला असता त्याला शेतकरी कुटुंबियांनी कडाडून विरोध केला. यावेळी बिल्डरने कंटेनर केबीन आत आणत असताना प्रवेशद्वाराजवळ शेतकरी कुटुंबातील महिलांनी ठिय्या दिला. पोलिसांनी या महिलांना दूर करीत ताब्यात घेतले आहे. हा वाद चिघळू नये यासाठी पोलिसांचा पोलिस बंदोबस्त त्याठिकाणी तैनात आहे.

शेतकरी वासूदेव पाटील यांच्या जागेत त्यांनी शेड उभारली आहे. जागेला पत्र्यांचे कुंपण घातले आहे.या जागकेत आज बिल्डर पाेहचला. त्यांनी न्यायालयाचे आदेश दाखवित जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मानपाडा पोलिस ठाण्याचे पाेलिस पोहचले. त्याठिकाणी पोलिसांच्या समोरच बिल्डर आणि शेतकरी कुटुंबियांत बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर वादात झाले. यावेळी जागेच्या संरक्षक कुंपणाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. प्रवेशद्वार बंद करण्यास बिल्डरकडून हरकत घेण्यात आली. तेव्हा पोलिसांनी प्रवेशद्वारे उघडे केले. प्रवेशद्वाराबाहेर बि्लडरने मागविलेले असंख्य खाजगी बाऊन्सर उभे होते. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. त्यानंतर शेतकरी कुटुंबातील महिलांनी प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला.

धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; चुलत भावानेच रचला हत्येचा कट

बिल्डरने कंटेनर केबिन एका टेम्पोबर आण्यास सुरुवात केली. प्रवेशद्वाराजवळ महिलांनी कंटेनर केबिन आत आण्यास तीव्र विरोध केला. त्यावेळी महिला पोलिसांनी विरोध करणाऱ्या शेतकरी महिलांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवून मानपाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी शेतकरी वासूदेव पाटील यांनी पोलिस जर बळाचा वापर करणार असतील आम्ही आमच्या जीवाचे बरे वाईट करु घेऊ असा इशारा पोलिसाना दिला. आमचा जीव गेला तरी आम्ही याठिकाणाहून हलणार नाही. याठिकाणी कायद्याचे राज्य आहे की नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

याबाबत शेतकरी वासूदेव पाटील यांचे म्हणणे आहे की, ही जागा वडिलोपार्जीत त्यांची आहे. या जागेवर त्यांचा कब्जा आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असता त्याठिकाणी बिल्डर पोलिस बळाचा वापर करुन जागेत शिरकाव करीत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आशिष पेडणेकर यांनी सांगितले की, ही जागा त्यांचे आजोबा दत्ताराम बारसकर यांची आहे. मी त्यांचा नातू आहे. ५० वर्षापूर्वी ही जागा घेतली होती. आमच्याकडे जागेची कागदपत्रे आहे. हे प्रकरण न्यायालयात गेेल्यावर न्यायालयाने आदेश दिले आहे. ही जागा मोकळी होती. त्याठिकाणी संबंधितांनी शेड बांधले आहे. त्यामुळे आमचीच जागा आम्ही हडप करतो हा आरोपच चुकीचा आहे.

घरात वाढदिवस साजरा करताना शेजारी भडकले अन् पुढे जे घडलं…

Web Title: Kalyan news marathi three women detained by police over land dispute between farmer and builder

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • kalyan
  • thane

संबंधित बातम्या

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त
1

Vasai Crime: जामिनासाठी खर्च केलेल्या पैशांवरून बहिणीवर गोळीबार; घरातून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण
2

Kalyan Crime: धक्कादायक! सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची केली निर्घृण हत्या; नोकरी-संपत्तीचा वाद ठरला कारण

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर
3

Kalyan Bicycle Travel : १५ सायकलस्वारांचा कल्याण ते उटी सायकल प्रवास, एका आठवड्यात कापणार १२०० किमीचे अंतर

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास
4

Local Body Election : ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाण्यातील माजी उपमहापौरांचा राजकीय संन्यास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.