Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

No-confidence motion : इंदिरा गांधींच्या नातवाचे काय हे ज्ञान…? रविशंकर यांनी लोकसभेत राहुल गांधींना धरले धारेवर

लोकसभेमध्ये अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव मांडला आहे. यावर लोकसभेमध्ये चर्चा सुरु असून रविशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 03:31 PM
Ravi Shankar Prasad criticizes Opposition Leader Rahul Gandhi during no-confidence motion debate

Ravi Shankar Prasad criticizes Opposition Leader Rahul Gandhi during no-confidence motion debate

Follow Us
Follow Us:
  • लोकसभेमध्ये अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
  • लोकसभेत राहुल गांधी आक्रमक
  • सत्ताधाऱ्यांच्या वतीने रविशंकर प्रसाद यांनी मांडली भूमिका
No-confidence motion : नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला (Om Birla) यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. लोकसभेमध्ये यावरुन जोरदार चर्चा झाली असून राहुल गांधींनी देखील आक्रमक भूमिका घेतली, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मला सभागृहामध्ये बोलू दिले जात नाही. मी बोलताना सातत्याने थांबवले जाते, असा आक्षेप मांडला. या वेळी सत्ताधारी पक्षाकडून रविशंकर प्रसाद यांनी भूमिका मांडली. यावेळी रविशंकर यांनी विरोधी पक्षाच्या सर्व आक्षेपांवर सडेतोड उत्तर दिले असून राहुल गांधींवर (Rahul Gandhi) निशाणा साधला आहे.

काय म्हणाले रविशंकर?

सभागृहामध्ये अविश्वास ठरावावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान काँग्रेसने आरोप केला की बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्याला वेळ दिला नाही. त्यांना २० वेळा बोलण्यापासून रोखण्यात आले. यावर रविशंकर यांनी सत्ताधारी एनडीएची भूमिका मांडली. ते म्हणाले की, “राहुल गांधी बोलत नसल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या जातात, परंतु प्रश्न असा आहे की ते प्रत्यक्षात काय बोलतात. जेव्हा मी निवडणूक प्रचारासाठी हरियाणाला गेलो होतो तेव्हा कोणीतरी मला सांगितले की राहुल गांधी म्हणाले होते की ते जिलेबी कारखाना लावतील. जेव्हा मला विश्वास बसला नाही तेव्हा मला एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यावर मी आश्चर्यचकित झालो की हे असं कसं होऊ शकतं आणि हे काय बोलत आहेत. देशभरातील प्रत्येक गावागावात जिलेबी तळली जाते. जिलेबी ही कारखान्यात बनत नाही,” असा उपरोधिक टोला रविशंकर यांनी लगावला आहे.

हे देखील वाचा : अविश्वास ठरावावर लोकसभेत जोरदार चर्चा; राहुल गांधींनी केले ‘हे’ गंभीर आरोप

पुढे ते म्हणाले की, “राहुल गांधींनी अमेरिकेच्या राजदूताला असेही सांगितले की, भारतातील इस्लामिक कट्टरतावादापेक्षा हिंदू कट्टरपंथी जास्त चिंताजनक आहेत. त्यांनी जे काही सांगितले, ते सर्व त्यांनी पुढे नेले. राहुल गांधी काय काय बोलले आहेत हे मी सांगितले तर त्याची एक यादीच तयार होईल, सभापतींविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव हा एखाद्याचा अहंकार पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.”

हे देखील वाचा : तेल अन् गॅस संकटात सरकारचा प्लॅन B! देश वाचवण्यासाठी मोदी सरकारची मोठी रणनीती

रविशंकर प्रसाद म्हणाले की, “राहुल गांधी माझ्यावर आरोप करतात की त्यांना बोलू दिले जात नाही. मात्र शेवटी ते काय बोलतात? ते म्हणाले की तपश्चर्येमुळे गरमी निर्माण होते. तपश्चर्या म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन आहे. शेवटी, इंदिराजींच्या नातवाला याबद्दल काय ज्ञान आहे? मला हे पाहून आश्चर्य वाटले. विरोधी पक्षाचे सदस्य पंतप्रधानांच्या खुर्चीजवळ कसे आले हे सर्वांनी पाहिले. राहुल गांधी हे सभागृह अराजकतेत बदलू इच्छितात. ही संसद सर्वोच्च आहे आणि तिची प्रतिष्ठा राखली पाहिजे. जर सभापतींविरुद्ध निराधार प्रस्ताव आणला गेला असेल तर आम्ही त्याचा विरोध करतो,” अशी भूमिका रवीशंकर प्रसाद यांनी घेतली आहे.

Web Title: Ravi shankar prasad criticizes opposition leader rahul gandhi during no confidence motion debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Loksabha
  • Om Birla
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
2

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
3

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.