
Satyaki Savarkar's warning on Sonia Gandhi book Savarkar controversy
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी मीडियाशी संवाद साधून सोनिया गांधींना इशारा दिला आहे. मी दोन दिवस कर्नाटकात होतो. युवा ब्रिगेडने सावरकरांच्या संदर्भातील एक कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मी तिकडे व्यस्त होतो. मला सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखाबद्दल समजले आहे. या पुस्तकात सावरकर यांच्यावर काही उल्लेख करण्यात आला आहे.”
शायना एन. सी. यांच्या लग्नाला उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे; जुने फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना
पुढे ते म्हणाले, “मी अजून पुस्तक वाचलेलं नाही. पण यापूर्वी राहुल गांधी यांनी देखील सावरकरांवर तथ्यहीन आणि संदर्भहीन भाष्य केलं होतं. त्यांच्यावर मी मानहानीचा दावा ठोकला होता. त्यात त्यांना कोर्टाने दणका दिला आहे. अशा परिस्थितीत मला सोनिया गांधी यांचं पुस्तक वाचताना असं काही आढळलं आणि सोनिया गांधी यांनी देखील सावरकरांबद्दल तथ्यहीन आरोप केले तर मी निश्चित कायदेशीर सल्ला घेणार आहे. सोनिया गांधींनाही मी कोर्टात खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा थेट इशारा सात्यकी सावरकर यांनी दिला.
सोनिया गांधींच्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला असून त्यांच्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. जेव्हा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या हातून मार खात होते आणि तुरुंगवास भोगत होते, तेव्हा आरएसएसचे ज्येष्ठ विचारवंत जसे की, विनायक दामोदर सावरकर हे त्यांच्या वसाहतवादी मालकांना दयेचे अर्ज लिहीत होते आणि त्यांचे सदस्य ब्रिटिश अधिकाऱ्यांशी खबऱ्या म्हणून हातमिळवणी करत होते, असे या पुस्तकात लिहिले आहे. यामुळे सात्यकी सावरकर यांनी सोनिया गांधी यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे.
Ans: पुस्तकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबतच्या कथित उल्लेखांवरून वाद निर्माण झाला आहे. या उल्लेखांमधून सावरकरांचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Ans: पुस्तकात सावरकरांबाबत तथ्यहीन आरोप आढळल्यास आपण कायदेशीर सल्ला घेऊन सोनिया गांधींविरोधात न्यायालयीन कारवाई करू, असा इशारा सात्यकी सावरकर यांनी दिला आहे.
Ans: सावरकरांचा कथित अवमान करणारे उल्लेख असल्याचा आरोप करत शिंदेसेनेसह काही संघटनांकडून या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.