Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज; रॅलीदरम्यान ‘मविआ’-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2024 | 07:27 PM
कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज; रॅलीदरम्यान 'मविआ'-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव

कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज; रॅलीदरम्यान 'मविआ'-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव

Follow Us
Close
Follow Us:

कराड: उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी सहकारमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी, त्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

त्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून दत्त चौकापर्यंत समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत भव्य रॅली काढली. या रॅलीत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी बाळासाहेब पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. शिवतीर्थ चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित जनसमुदाय लिबर्टी मैदान येथे होणाऱ्या सभास्थळी रवाना झाला.

तदनंतर येथील कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व नियोजन समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी माध्यमांची संवाद साधताना ते म्हणाले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने अनेक वर्ष मला सहकार्य केले आहे. याठिकाणी विकासावर आधारित राजकारण करण्यावर आपला नेहमीच भर राहिला आहे. सहकार व पणनमंत्री पदाच्या कार्यकाळात आपण मतदारसंघात अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला.

ते पुढे म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची पाठराखण करणारा जिल्हा आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही आपण यशवंतराव चव्हाण, आदरणीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या विचारांनुसारच राजकीय वाटचाल करत आहोत. मतदारसंघात विरोधकांकडून जातीवादी विचार रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, ही विचारांची लढाई असून येथील सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, दत्त चौकामध्ये आ. बाळासाहेब पाटील आणि भाजपचे नेते मनोज घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांचा समूह समोरासमोर आल्याने या ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. त्यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. शिवसेनेशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही या महाआघाडीत समावेश आहे. दुसरीकडे, विरोधी आघाडी एम.व्ही.ए. यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी), ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल बोलायचे तर, भाजपने १६५ उमेदवार उभे केले होते आणि १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला होता.

Web Title: Karad north mva candidate balasaheb patil fill candidate form for maharashtra election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 07:27 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • BJP

संबंधित बातम्या

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
1

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
2

PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
3

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन
4

“प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी…”, भाजपचे डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.