Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: कराडच्या राजकारणात ‘यशवंत’ विचारांची कसोटी! सेस फंडावरून पंचायत समितीत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

नगरपालिकेच्या सभेतही घनकचरा व्यवस्थापनासह विविध विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. संबंधित कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. सत्ताधारी गटाने हे आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 03, 2026 | 12:54 PM
Karad Politics Yashwantrao Chavan Ideology, Karad Panchayat Samiti Cess Fund Dispute

Karad Politics Yashwantrao Chavan Ideology, Karad Panchayat Samiti Cess Fund Dispute

Follow Us
Follow Us:

Karad News : यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीला संवाद, संयम आणि विकासाची दिशा दिली. मात्र, त्यांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये अलीकडच्या काळात पंचायत समिती आणि नगरपालिका सभांमध्ये विविध मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षामुळे स्थानिक राजकारणाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद लोकशाहीचा अविभाज्य भाग असले, तरी ते व्यक्त करताना सभागृहातील संवादाची पातळी, परस्परांचा सन्मान आणि विषयाधारित चर्चा कायम राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Sanjay Raut Protest In Vaduj : जयकुमार गोरे यांच्यावरील वक्तव्य संजय राऊतांना भोवले; वडूजमध्ये भाजपचे ‘जोडे मारो’

कराड पंचायत समितीच्या सभेत सेस फंडाच्या वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद निर्माण झाले. निधीवाटपाच्या पद्धतीवर आक्षेप घेत विरोधी सदस्यांनी सभात्याग करत सभागृहाबाहेर आंदोलन केले. घोषणाबाजीमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. निधीवाटपात अन्याय झाल्याचा आरोप विरोधकांनी केला; तर सत्ताधारी गटाने हा आरोप फेटाळून लावत संबंधित विषयाची पूर्ण माहिती न घेता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे स्पष्ट केले.

या घटनेनंतर निधीवाटपाच्या मुद्द्याबरोबरच कराडच्या राजकीय परंपरेवरही चर्चा रंगली. विशेष म्हणजे, दोन्ही बाजूंनी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा संदर्भ दिल्याने त्यांच्या विचारांचा राजकीय आचरणातील नेमका अर्थ काय, हा प्रश्नही पुढे आला.

नगरपालिकेच्या सभेतही घनकचरा व्यवस्थापनासह विविध विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. संबंधित कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. सत्ताधारी गटाने हे आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली. आमदारांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विकासनिधीचे स्वागत असल्याचे सांगतानाच, प्रस्तावित काही विकासकामांना भाजपच्या सदस्यांकडूनच विरोध होत असल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला.

Tax Devolution To Maharashtra: केंद्राकडून राज्यांना १.०९ लाख कोटींचा कर हप्ता जारी

नेकलेस रोड, तसेच यशवंतराव चव्हाण समाधी परिसराच्या पुनर्निर्माण व सुशोभीकरणाच्या कामांवरूनही दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका मांडल्या. नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत विरोधकांनी केलेले आरोप फेटाळत विकासकामांबाबत सत्ताधारी स्थानिक आघाडीची भूमिका स्पष्ट केली.

लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना त्यांच्या निर्णयांबाबत प्रश्न विचारले जाणे आणि विरोधकांनी धोरणांवर आक्षेप नोंदविणे स्वाभाविक आहे. मात्र, राजकीय मतभेदांचे रूपांतर वैयक्तिक संघर्षात न होता ते तथ्य, विषय आणि सभागृहातील चर्चेच्या माध्यमातून व्यक्त होणे अपेक्षित आहे.

कराडची राजकीय ओळख यशवंतराव चव्हाणांच्या विचारांशी जोडली गेली असल्याने येथील राजकीय घडामोडींना वेगळे महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांपेक्षा विकासकामांची दिशा, निधीवाटपातील पारदर्शकता, प्रशासनाला जबाबदार धरणे आणि सभागृहातील विधायक संवाद यांना प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राजकीय भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी कराडच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचे भान दोन्ही बाजूंनी जपणे गरजेचे आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा आणि विचारांचा संदर्भ देताना तो केवळ भाषणापुरता न राहता प्रत्यक्ष राजकीय आचरणातही प्रतिबिंबित व्हावा, हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त होत आहे.

‘यशवंत’ विचार केवळ नावापुरते नको!

यशवंतराव चव्हाणांचा विचार म्हणजे केवळ राजकीय वारशाचा उल्लेख नव्हे, तर मतभेदांमध्येही संवाद राखणे, संयमाने भूमिका मांडणे आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणे होय. त्यामुळे कराडमधील सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘यशवंत विचारांचा खरा अर्थ आचरणातून दिसणार कधी?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.

…ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी!

विकासकामे, निधीवाटप अथवा प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे हा विरोधकांचा लोकशाही अधिकार आहे. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांनीही आक्षेप ऐकून घेऊन निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. मतभेद असणे ही लोकशाहीची ताकद आहे; मात्र ते सभागृहातील विधायक संवादातून हाताळणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे.

 

 

Web Title: Karad panchayat samiti cess fund row political conflict yashwantrao chavan ideology

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • Karad
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
3

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
4

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.