Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर शिक्षकांनी खरंतर भर द्यावा. स्पर्धा परीक्षांशिवाय मुलांना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे गुणवत्ता ही तितकीच गरजेची बाब झाली आहे. यावेळी तालुक्यातील एकूण ३२ शिक्षकांचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 14, 2026 | 01:31 PM
घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Follow Us
Follow Us:

मेढा : दिवसेंदिवस ग्रामीण भागातील शाळांमधील पटसंख्या घटत चालली आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. ही चिंताजनक बाब असून, शिक्षकांनी याचे खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शाळांचा भौतिक दर्जा सुधारण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात येत असूनही शिक्षकांनी सर्वोत्तम काम करून शाळांचा पट वाढवण्यावर भर द्यावा, असे देखील जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी सांगितले.

जावली पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील एकूण ३२ शिक्षक, केंद्रप्रमुख, गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांच्या गुणगौरव समारंभात मानकुमरे यांनी शिक्षकांना आपल्या खास शैलीतून शिक्षकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी माजी आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य जयश्री गिरी, कविता ओंबळे, सभापती सौरभ शिंदे, पंचायत समिती सदस्या चारुशीला पवार, सुनीता दूदळे, शिल्पा शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप परामणे, मारुती चिकणे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, शिक्षक संघाचे नेते मच्छिंद्र मुळीक आदी उपस्थित होते.

Police Molestation Case: ‘चल येते का…’ म्हणत महिलेची छेड; कर्जतमध्ये पोलिस कर्मचाऱ्याविरोधात संताप, नेमका प्रकार काय?

यावेळी सौरभ शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर शिक्षकांनी खरंतर भर द्यावा. स्पर्धा परीक्षांशिवाय मुलांना पर्याय उरलेला नाही. त्यामुळे गुणवत्ता ही तितकीच गरजेची बाब झाली आहे. यावेळी तालुक्यातील एकूण ३२ शिक्षकांचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

अनेक शिक्षकांना राजकारणाचे लागलेत डोहाळे

खरंतर आयुष्यभर विद्यार्थ्यांना शिकवून विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर आपल्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत निवांत राहायला हवे. मात्र, सेवानिवृत्त होताच शिक्षक राजकारणाच्या आखाड्यात उतरत असतील तर आमच्या सारख्या राजकारण्यांनी नेमकं करायचे तरी काय? असा मिष्किल व बोचरा सवाल तालुक्यात नव्याने स्वयंघोषित राजकारणात येऊ पाहणाऱ्या शिक्षक नेत्यांना मानकुमरे यांनी लगावला. त्यामुळे खरंतर शिक्षकांनी त्यांच्या या सल्ल्याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, अशीच चर्चा उपस्थितांमध्ये यावेळी रंगली.

Amravati News : एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड

Web Title: Schools on verge of closure due to declining student enrollment says vasantrao mankumre

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
1

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी
2

Mahabaleshwar News : मेटगुताडमध्ये एसटीचा कहर! पर्यटकांच्या इकोला धडक; मुलगी गंभीर जखमी

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
3

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
4

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.