Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज ; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त

Local Body Election स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात पोलीसांचा मोठा फौजफाटा सज्ज झाला आहे. कर्जत नगरपरिषदेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 01, 2025 | 06:05 PM
Karjat News : कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज ; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज
  • शहरात मोठा पोलीस बंदोबस्त
  • मतदान केंद्रावर EVM मशीन पोहचली
कर्जत/संतोष पेरणे :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरात पोलीसांचा मोठा फौजफाटा सज्ज झाला आहे. कर्जत नगरपरिषदेच्या उद्या म्हणजेच 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.मतदान केंद्रावर EVM मशीन पोहचली असून कर्जत शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्जत नगरपरिषदेसाठी 10 प्रभाग असून 33 मतदान केंद्र बनविण्यात आली आहे.त्या सर्व प्रभागातील मतदान केंद्र येथे निवडणूक विभागाकडून मतदान यंत्र देण्यात आली.त्यासाठी आज सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मतदान साहित्य घेण्यासाठी मतदान केंद्र अधिकारी आणि त्या मतदान केंद्रातील कर्मचारी यांची एकच  गर्दी जमली होती.

कर्जत नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ धनंजय जाधव,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पालिका मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक,महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी यांना नेमण्यात आले आहे.

Eknath Shinde एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर

या निवडणुकीसाठी दहा प्रभागात 33 मतदान केंद्र असून एका मतदान केंद्रासाठी मतदान केंद्र अधिकारी,सहायक मतदान केंद्र अधिकारी,मतदान अधिकारी,एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यासाठी 200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून तीन प्रभागासाठी लागणारे कर्मचारी यांना राखीव ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

कर्जत शहरात कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदान केंद्र परिसरात मतदार यांचे प्रतिनिधी तसेच झोनल अधिकारी यांना प्रवेश असणार आहे.मतदान केंद्र येथे आज दुपार पासून कर्मचारी पोहचले असून निवडणूक यंत्रणा उद्या होणाऱ्या मतदानासाठी सज्ज आहे.उद्या 33 मतदान केंद्रावर 29957 मतदार मतदान करणार असून थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि 21 सदस्य यांच्यासाठी 46उमेदवार रिंगणात आहेत.

Maharashtra News : “भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी

Web Title: Karjat news election machinery ready in karjat heavy police deployment in the city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • karjat news
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

Karjat News : टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा
1

Karjat News : टोरंटो कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाण्याची चोरी; बंधाऱ्यावर मोटार लावून बेकायदेशीर उपसा

Karjat : रेल्वे कारशेडच्या कामामुळे या गावांना महापुराचा धोका
2

Karjat : रेल्वे कारशेडच्या कामामुळे या गावांना महापुराचा धोका

Karjat News :  टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश
3

Karjat News : टोरेंटबाबत ग्रामस्थांचा आक्षेप; ग्रामपंचायती प्रकल्पाला गो बॅकचे निर्देश

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन
4

Karjat News : टोरंट वीज प्रकल्प विरोधात शिवसेना ठाकरे गट स्थानिकांच्या पाठीशी; जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिलं निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.