Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले; आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय

तालुक्यातील ढाक,पोटल,पाली या भागात टोरंट कंपनी आपला वीज प्रकल्प उभारत आहे.या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 02:41 PM
Karjat News : टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले; आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • टोरंट वीज प्रकल्पाच्या विरोधात शेतकरी एकवटले,
  • आक्रमक गावतकऱ्यांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील ढाक,पोटल,पाली या भागात टोरंट कंपनी आपला वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. पर्यावरण सुनावणीमध्ये देखील तीव्र विरोध निदर्शने देखील शेतकऱ्यांच्या विरोधकांकडे दुर्लक्ष करीत झाडे कापण्याची कामे सुरु करण्यात आली आहेत. दरम्यान या भागातील शेतकऱ्यांनी पाली गावात बैठक घेऊन धरणाला विरोध करण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.

टोरंट वीज प्रकल्पामुळे धरण परिसरात तब्बल 25 हजार झाडे तोडली जात आहेत.त्यामुळे प्रदूषणाचा विषय समोर येणार असून हे धरण व्हावे किंवा नाही याबाबत परिवाराण विषयक जनसुनावणी कर्जत जवळची गौरकामत येथे घेण्यात आली. त्यावेळी सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र ससाणे टोरंट कंपनीला रेड कार्पेट दाखवत हा प्रकल्प उभारण्यास केंद्रीय परिवाराण मंत्रालयाची परवानगी आहे असा दखला दिला. मुळात या प्रकल्पमुळे हजारो एकर वन जमीन वापरली जाणार असून वन जमीन स्थानिक शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी दिली जात नाही, मग टोरंट कंपनीला2100 हेकटर जमीन धरण बांधण्यासाठी कशी दिली जाते? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आयात या भागातील शेतकरी आक्रमक झाला असून या शेतकऱ्यांनी धरणाला विरोध करण्यासाठी आरपारची लढाई पुकारली आहे. टोरंटो कंपनीच्या विरोधात रात्री पाली येथे मिटींग घेण्यात आली.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी जिल्हा परिषद सदस्य मारूती तथा बाबू घारे सामाजिक कार्यकर्ते जगदिश ठाकरे लहु श्रीखंडे चेतन पवाळी सुनिल मसणे चंदू हगवणे सुरेश मसणे पप्पु देशमुख यांसह आंबोट पोटल पाली येथील ग्रामस्थ व बाधित आदिवासी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

या मिटींगमध्ये टोरंटो कंपनी आदिवाशींवर अन्याय करत आहेत याचा आदिवाशींनी सर्वांसमोर पाढाच वाचला.आदिवासींचे फॅारेस्टच्या जमिनीत दली प्लॅाट दिलेले आहेत. सदर प्लॅाटमध्ये मागे शासनाची कामे केली गेलेली आहेत तसेच त्या प्लॅाटमध्ये आदिवाशींनी आंबा लागवड करून शेती करत आहेत. परंतु सदर जागा टोरंटो प्रकल्पामध्ये जात असल्याने फॅारेस्ट विभागाचे अधिकारीटोरंटो कंपनीच्या दबावामुळे आदिवासींना ही जमीन तुमची नाही असे आदिवासींची फसवणुक करत आहेत. या प्रकल्पामुळे होणारे नुकसान निसर्गाचे व पर्यावरणाची होणारी हानी यावर चर्चा करण्यात आली टोरांटोचे चालू असलेले काम बंद करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचवेळी नजीकच्या काळात कर्जत तहसील कार्यालयाकडे मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.लवकरच या पायी मूक मोर्चाचे आयोजन करण्यासाठी बैठका घेण्यात येतील आणि सर्व गावकरी शेतकरी यांच्याकडून मोर्चाचे आयोजन केले जाईल असे यावेळी निश्चित करण्यात आले.

Karjat News : जलजीवन मिशन योजनेसाठीचे पाईप जळून खाक; आगीमुळे नेरळ परिसरात धुराचे लोट

Web Title: Karjat news farmers unite against torrent power project aggressive villagers decide to hold silent march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:39 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?
1

Education Minister Net Worth: नवीन की जुने… शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी की धर्मेंद्र प्रधान, कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत?

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण
2

Patanjali Atta : पतंजलीच्या पिठात आढळलं कीटकनाशक! बाजारातून साठा मागे घेण्याचे आदेश; शेअर्समध्ये मोठी घसरण

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ
3

Amravati News: हेल्मेट सक्तीचा गैरफायदा? अमरावतीत बनावट हेल्मेटची विक्री; नागरिकांच्या जीवाशी खेळ

Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प
4

Chandrapur News: चिखलात अडकले शेतकऱ्यांचे पाय! चंद्रपुरातील पांदण रस्त्यांची दुरवस्था, शेतीची कामे ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.