Karuna Munde News:
Karuna Munde Allegations on Dhananjay Munde:गेल्या काही वर्षांत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करूणा मुंडे यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करूणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केले आहे. या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
करूणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडेंनी माझी आई मनोरमा शर्मा यांचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले.माझ्या ड्रायव्हरचीही हत्या केली. इतकच नाही तर माझ्या बहिणीचाही लैंगिक छळ केला. माझ्या ड्रायव्हरची हत्या केली. धनंजय मुंडेंच्या छळामुळे माझ्या आईने आत्महत्या केली. माझ्याकडे तिच्या आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी देखील आहे. धनंजय मुंडेंनी गुंडांची एक गॅंग पाळली आहे. बीडमधील एल्गार परिषदेत धंनजय मुंडे म्हणाले होते की, जो हल्ला करेल त्याला चोख उत्तर द्या, आता मी त्यांना आव्हान देते. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. असे खुले आव्हानही करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना दिले आहेत.
‘Thamma’ की ‘Ek Deewane Ki Deewaniyat’ ? ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘या’ चित्रपटाने मारली बाजी
धनंजय मुंडेंना स्वतःला तरी जीआर समजतो का, त्यांना प्रतिज्ञापत्र समजते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. करूणा मुंडे म्हणाल्या, “मी धनंजयविरुद्ध निवडणूक लढवली. लोकांना त्यांची (धनंजय मुंडे) लायकी कळली असती, पण आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून त्यांनी माझा अर्ज रद्द करून घेतला.
हे लोक समाजातील लोकांना न्याय देऊ शकत नाहीत; त्यांना फक्त त्यांच्या राजकीय हितसंबंधांमध्ये रस आहे. आमच्या ताटातले काढून घेऊ नका, असे ते लोकांना म्हणतात, पण जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी लोकांचे हक्काच्या गोष्टी काढून घेतल्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या.
करुणा मुंडे म्हणाल्या, ” चार दिवसांपूर्वी मी मनोज जरांगे पाटील यांना भेटले आणि त्यांच्याकडे न्याय मागितला, पण त्यांनी माझ्या घरगुती कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.” जरांगे म्हणाले, “मी माझ्या भांडणात महिलांचा वापर करत नाही. मी धनंजयला उत्तर देण्यास सक्षम आहे.” असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वी राजयाचे मंत्री छगन भुजबळ यांनी बीड जिल्ह्यात राज्यातील ओबीसी समाजाची महासभा आयोजित केली. या सभेला माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर प्रमुख ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. बैठकीदरम्यान भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्यावर तीव्र निशाणा साधला. तर धनंजय मुंडेंनी थेट मनोज जरांगे- पाटील यांच्यावर टीका केली होती.
धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंनी मूर्ख म्हणत त्यांना सरकारी आदेशांची (जीआर) समज नसल्याचा दावा केला. पण, जरांगे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे करुणा शर्मा संतापल्या आहेत. मनोज करुणा यांनी त्यांचे माजी पती धनंजय यांच्या विवेकबुद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येसह गंभीर आरोप केले आहेत.