दिवाळीनिमित्त घरात मोठ्या संख्येने पाहुणे येतात. पाहुणे, नातेवाईक घरी आल्यानंतर कायमच फराळ आणि काहींना काही मिठाई देऊन त्यांचे स्वागत केले जाते. पण कायमच फराळ आणि मिठाईतील गोड पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी काही हटके आणि झटपट तयार होणाऱ्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत.तुम्ही बनवलेले चमचमीत आणि टेस्टी पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. (फोटो सौजन्य – istock)
दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा 'हे' खमंग पदार्थ
उत्तर भारतातील चाट हा पदार्थ जगभरात सगळीकडे फेमस आहे. त्यामुळे घरी तुम्ही समोसा चाट टाको बनवू शकता. हा पदार्थ सामोसा, हिरवी चटणी, चिंच चटणी, शेव इत्यादी पदार्थ टाकून बनवला जातो.
दही कबाब हा भारतीय जेवणातील फेमस पदार्थ आहे. थाई काफिर लाईम फ्लेवर आणि इटालियन रिकोटा चीज यांचे मिश्रण बनवून तयार केलेला पदार्थ कबाब सोबत खाल्ला जातो.
दही कबाब हा भारतीय जेवणातील फेमस पदार्थ आहे. थाई काफिर लाईम फ्लेवर आणि इटालियन रिकोटा चीज यांचे मिश्रण बनवून तयार केलेला पदार्थ कबाब सोबत खाल्ला जातो.
उत्तर भारतातील प्रसिद्ध कुरकुरीत कचोरी लहान कॅनपे साऱ्यांचे आवडते. दही आणि गोड-आंबट चटणीचा हलका थर लावून बनवलेला पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होईल.
पाहुण्यांसाठी तुम्ही सँडविचचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवू शकता. हा पदार्थ बनवताना जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी खर्चात सँडविच बनवले जाते.