Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Mumbai Goa Highway: कशेडी ते लोटे महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या मार्गावर ४० अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. महामार्गावरील चार ‘ब्लॅक स्पॉट’वर ठोस सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी होत असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले..

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 28, 2026 | 11:36 AM
कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा! नऊ महिन्यांत ४० अपघात, १२ जणांचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • कशेडी ते लोटे महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!
  • अवघ्या नऊ महिन्यांत ४० अपघात
  • १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जण जायबंदी
  • चार ‘ब्लॅक स्पॉट’वर प्रशासनाची बघ्याची भूमिका
देवेंद्र जाधव, खेड : कोट्यवधी रुपये खर्चून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले. प्रवास वेगवान आणि आरामदायी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र कशेडी घाट ते लोटे हा सुमारे ३० किलोमीटरचा टप्पा आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या मार्गावर तब्बल ४० अपघातांची नोंद झाली असून १२ जणांना जीव गमवावा लागला, तर ३० हून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तरीही प्रशासनाची यंत्रणा जागी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. (Mumbai Goa Highway)

या मार्गावरील कशेडी बोगदा, खवटी वळण, जगबुडी पूल आणि लोटे फाटा हे चार ठिकाणे धोकादायक ठरत असताना त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. अपघातांची मालिका सुरू असतानाही ‘ब्लॅक स्पॉट’ केवळ कागदावरच राहिले आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

कशेडी बोगद्यात पाणी, अंधार अन् निसरडा रस्ता

कशेडी बोगद्यातून वाहतूक वेगवान झाली असली तरी पावसाळ्यात बोगद्याच्या अंतर्भागात पाण्याचे पाट वाहणे, गळती होणे आणि रस्ता निसरडा होणे यामुळे वाहनचालकांसमोर मोठा धोका निर्माण होतो. प्रकाशव्यवस्था आणि घसरणरोधक सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असल्याने विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. काही दिवसांपूर्वी बोगद्यातील मोठ्या प्रमाणातील दिवे बंद असल्याचेही समोर आले होते.

खवटीच्या तीव्र वळणावर फलकच नाहीत!

खवटी येथील रेल्वे पुलाजवळील तीव्र वळण अपघातप्रवण बनले आहे. या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक, ब्लिंकर आणि इतर सावधगिरीच्या उपाययोजनांचा अभाव असल्याने वाहनचालकांना अचानक वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघातांची मालिका सुरूच आहे.

जगबुडी पुलावर कंटेनर नदीपात्रात; तरीही प्रशासनाला जाग नाही!

जुलै आणि ऑगस्टमध्ये जगबुडी पुलावर नियंत्रण सुटलेले अवजड कंटेनर थेट नदीपात्रात कोसळल्याच्या घटना घडल्या. या घटनांनंतर तरी प्रशासनाने धडा घेणे अपेक्षित होते. मात्र धोकादायक ठिकाणी मजबूत क्रॅश बॅरिअर्स उभारण्याचे काम अद्याप झालेले नाही. एखादा मोठा जीवघेणा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करण्याची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

आता आश्वासने नकोत; प्रत्यक्ष सुरक्षा उपाय हवेत!

गणेशोत्सव असो, दिवाळी असो, शिमगोत्सव असो किंवा कोकणवासीयांचा दैनंदिन प्रवास—या महामार्गावरील प्रवास रक्तरंजित होणे थांबणे गरजेचे आहे. नऊ महिन्यांत १२ जणांचा बळी आणि ३० हून अधिक जखमी ही आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे.

त्यामुळे कशेडी ते लोटे या संपूर्ण टप्प्याचे तातडीने सेफ्टी ऑडिट करून सर्व ‘ब्लॅक स्पॉट’वर शास्त्रोक्त सुरक्षा उपाययोजना, क्रॅश बॅरिअर्स, दिशादर्शक फलक, ब्लिंकर, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि घसरणरोधक उपाय तातडीने करण्यात यावेत, अशी मागणी जोर धरत आहे. आता पाहणी, बैठका आणि आश्वासनांचा फार्स नको; वाहनचालकांचा जीव वाचविण्यासाठी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Web Title: Kashedi lote highway accidents 40 crashes 12 deaths four black spots road safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai-Goa highway

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’
1

Manoj Jarange Patil: ‘मेलो तरी चालेल,मी…’, मनोज जरांगे आक्रमक, चौकशांवरून सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले-‘रात्र वैऱ्याची आहे’

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?
2

Transport Employees Salary Hike: वेतनवाढीसाठी परिवहन कर्मचारी आक्रमक; आज काम बंद आंदोलनावर ठाम, प्रवाशांचे हाल होणार?

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड
3

Maharashtra Badminton Association च्या अध्यक्षपदी अरुण लखानी, तर सिद्धार्थ पाटील यांची मानद सरचिटणीसपदी बिनविरोध निवड

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या
4

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.