सौजन्य फोटो - सोशल मिडीया
अपघाताची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, दीपक मते यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यासाठी १०८ रुग्णवाहिकेसह नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचीही मदत घेण्यात आली. दोन्ही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय दवंगे याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय बोडखे याच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अक्षय दवंगे काही दिवसांपासून कंपनीच्या कामातून सुटीवर होता. पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर परिसरात राहण्याची व्यवस्था करायची होती. त्यासाठी तो मित्र अक्षय बोडखे याच्यासोबत रूम पाहण्यासाठी शहरात आला होता. रूम पाहून गावी परतताना दौलताबाद घाटात त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन्ही तरुण अविवाहित होते. या दुर्दैवी घटनेमुळे मनूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास दौलताबाद पोलिसांकडून सुरू आहे.






