Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत

सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले; पण यावेळी ते परतलेच नाहीत, शेतात गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. ही बातमी कळताच मळणगावात एकच हंबरडा फूटला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 20, 2026 | 12:02 PM
Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत
Follow Us
Close
Follow Us:
  • कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याने आयुष्य संपवलं
  • द्राक्षबाग उभारण्यासाठी घेतलेले २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज
  • रोगराई आणि हवामानातील अनियमिततेमुळे तीनही एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत.
Kavathe Mahankal: शेतकऱ्याच्या घामाने हिरवीगार झालेली द्राक्षबाग… आणि त्याच बागेशेजारी अखेर गळफास घेतलेला मालक… हे दृश्य पाहून मळणगाव आज अक्षरशः सुन्न झाले आहे. कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या एका कष्टकरी शेतकऱ्याने जगण्याचा धागाच तोडून टाकला आणि संपूर्ण गावावर दुःखाची काळी छाया पसरली. प्रतापराव श्रीपतराव शिंदे (वय ५४) या मेहनती द्राक्षबागायतदाराने आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

प्रतापराव शिंदे हे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते. तीन एकरात उभी केलेली द्राक्षबाग ही त्यांच्या आयुष्याची ओळख होती. आधुनिक शेती पद्धती, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी बाग फुलवली होती. पण बदलते हवामान, वाढलेला खर्च, खत-औषधांच्या दरातील प्रचंड वाढ आणि बाजारातील अनिश्चितता यांनी त्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः घाला घातला.

पाटण तालुक्यात 23 ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 28 एप्रिलला होणार मतदान

२५ लाखांचे कर्ज… आणि संपलेले सर्व मार्ग

द्राक्षबाग उभारण्यासाठी घेतलेले २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या गळ्यातील फास बनले. उत्पन्न मिळेनासे झाल्याने कर्ज थकीत गेले. व्याजाचा बोजा वाढतच गेला. एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज-अशी साखळी सुरू झाली. फेडरल बँकेकडून कर्ज घेऊन जुने कर्ज फेडले, पण नव्या हप्त्यांनी त्यांना अधिकच गुदमरवले.

बागच नाही उरली… जगण्याची आशाही संपली

या वर्षी निसर्गाने पूर्णपणे पाठ फिरवली. रोगराई आणि हवामानातील अनियमिततेमुळे तीनही एकर बागेला द्राक्षेच लागली नाहीत. वर्षभराचा खर्च पाण्यात गेला.
शेवटी विवश होऊन त्यांनी स्वतःच्या हाताने उभी केलेली द्राक्षबाग तोडून टाकली.त्या क्षणी त्यांच्या आयुष्याची उभी दुनिया कोसळली होती.

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका; गारपिटीमुळे रब्बीतील गहू, मका पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान

“कर्ज कसे फेडायचे?” – मन पोखरणारा प्रश्न

मार्च अखेर जवळ येत असताना बँकांचे हप्ते, घराची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाची चिंता, या सगळ्यांनी त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नाही, आणि कर्जाचा वाढता डोंगर या कात्रीत सापडलेल्या प्रतापरावांनी अखेर हार मानली.

सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले; पण यावेळी ते परतलेच नाहीत, शेतात गळफास घेत त्यांनी जीवन संपवले. ही बातमी कळताच मळणगावात एकच हंबरडा फूटला. प्रतापराव शिंदे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे, तर मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. ज्यांच्या भविष्यासाठी त्यांनी स्वप्ने पाहिली, त्याच कुटुंबाला आज आधाराचा स्तंभ गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण गाव उपस्थित होते, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते.

“शासनाने दखल घ्यावी” – सरपंचांची मागणी

“मेहनती शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे जीव द्यावा लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. शासनाने त्यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी, कर्ज माफ करावे आणि द्राक्षबागायतदारांसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.” अशी मागणी मळणगावच्या सरपंच सुरेखा जाधव यांनी केली आहे.

 

Web Title: Kavathe mahankal news 25 lakh debt and failed crops lead to progressive farmers death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Farmer Suicide
  • sangli news

संबंधित बातम्या

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली
1

कोयनेतून सिंचनासाठी विसर्ग सुरू; सांगली पाटबंधारे विभागाकडून मागणी वाढली

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ
2

सांगलीत जिल्हा परिषद शाळांचा डंका! गुढीपाडव्याला ६०.९४% प्रवेश पूर्ण; तीन वर्षांत पटसंख्येत १० टक्क्यांची विक्रमी वाढ

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष
3

Sangali Zilla Parishad महाविकास आघाडीचा झेंडा; संगीता पाटील अध्यक्ष, ऋषीकेश लाड उपाध्यक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.