Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवा’; PCMC आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना

पूरजन्य परिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी शाळांचे नियोजन करा. नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करा, असेही निर्देश दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2025 | 12:50 PM
Pimpri News : 'लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?'; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं

Pimpri News : 'लहान मुलांसारखं वारंवार सांगायचं का?'; आयुक्त शेखर सिंह यांनी लेटलतिफ कर्मचाऱ्यांना चांगलंचं झापलं

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपात्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी आणि आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा, असे निर्देश पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

महानगरपालिकेतील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात झालेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत आयुक्त सिंह बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, मुख्य वित्त लेखा अधिकारी प्रवीण जैन यांच्यासह शहर अभियंता, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रिय अधिकारी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचते, अशी ठिकाणे तात्काळ शोधून काढून तेथे कायमस्वरुपी उपाययोजना करा. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस देण्यासोबतच तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती सुरक्षितस्थळी हलवण्याचे नियोजन करा.

तसेच पूरजन्य परिस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी शाळांचे नियोजन करा. नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करा, असेही निर्देश आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.

नागरिकांच्या मदतीसाठी पथके राहणार कार्यरत

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळावी, यासाठी जलद प्रतिसाद पथके कार्यरत करण्याबाबत आयुक्त सिंह यांनी निर्देश दिले आहेत. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य, उद्यान अशा विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश करून रात्रीच्यावेळी देखील ही पथके कार्यरत ठेवावेत, असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.

अनधिकृत व धोकादायक होर्डिंग काढण्याचे दिले आदेश

आकाशचिन्ह विभागाने शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग तातडीने काढून घ्यावेत. दोन दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात यावे. शहरात नालेसफाईच्या सुरू असलेल्या काम तात्काळ पूर्ण करावे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक विभागाने एकमेकांशी समन्वय ठेवावा. क्षेत्रीय अधिकारी यांनीही त्यांच्या प्रभागात आपत्कालीन यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी दिले.

Web Title: Keep the system ready to deal with emergency situations says pcmc commissioner shekhar singh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri News

संबंधित बातम्या

PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळी बोनस जाहीर; अधिकारी-कर्मचारी होणार आनंदात
1

PCMC News: पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळी बोनस जाहीर; अधिकारी-कर्मचारी होणार आनंदात

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी
2

Dussehra: विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी…; सराफ बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर
3

आमदार शंकर जगताप ‘ॲक्शन मोडवर, भुजबळ चौक ते भूमकर चौकातील कामं करणार ‘फास्ट ट्रॅक’वर

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…
4

Crime News: AI चा असाही गैरवापर! तरूणीला थेट फोटो अश्लील पद्धतीने एडिट करण्याची धमकी दिली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.