Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Bridge Collapsed : कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी! चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला

Chiplun Khadpoli bridge collapsed : चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. 

  • By प्रीति माने
Updated On: Aug 24, 2025 | 08:48 AM
Khadpoli bridge collapses in Chiplun kokan Marathi news update

Khadpoli bridge collapses in Chiplun kokan Marathi news update

Follow Us
Follow Us:

Chiplun Khadpoli bridge collapsed : रत्नागिरी : लवकरच गणेशोत्सव सण साजरा केला जाणार आहे. यासाठी पुणे मुंबईहून गावी जाणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अनेक जण रेल्वेचा प्रवास करतात. तर काही जण हे रस्त्याच्या मार्गाने देखील गावाकडे मार्गस्थ होत असतात. पण गावांकडे सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या कोकणकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला असल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील खडपोली पूल कोसळला आहे. पिंपळी नंदिवसे येथील प्रजिमा 23 साखळी क्रमांक 1/00 खडपोली पूल कोसळला आहे. ही दुर्घटना काल (दि,23)  रात्री 10.30 वाजतच्या सुमारास घडली असून पूल कोसळला आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून येत आहे. सध्या तरी अलोरे पोलीस ठाणे हद्दीतील पेंडाबे ते खडपोली जाणाऱ्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे., या पुलाच्या दुर्घटनेमुळे पिंपळी-खडपोली-दसपटी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

चिपळूणमधील खडपोली पूल हा 1971 मध्ये बांधण्यात आला होता. वीस मिटर लांबीचा हा पूल सध्या कमकुवत झाल्याने त्याच्या पुनर्बांधणीची मागणी होत होती. त्यामुळे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे 5 जुलै रोजी चिपळूण येथे सहकार भवन येथे आलेले असताना त्यांनी घेतलेल्या बैठकीत हा पूल एमआयडीसी कडून उभारण्यात येईल असे सांगून अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या.

नवीन पूलाचा प्रस्ताव अन् निधी मंजूर

हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एम आय डी सी कडे हस्तांतरित केलेला होता. पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील ‘सहकार भवन’मध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते. पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करुन, पावसाळ्यानंतर काम सुरु झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासाही आरामदायी राहिलेला नाही. प्रचंड गर्दीमुळे रेल्वे प्रवासामध्ये अनेक गैरसोयी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि कोकण विशेष एक्सप्रेससारख्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात कोकणवासीय प्रवास करतात. मात्र, या गाड्यांमध्ये इतकी गर्दी झाली आहे की प्रवाशांना उभे राहायला देखील जागा मिळत नाही.

Web Title: Khadpoli bridge collapses in chiplun kokan marathi news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Chiplun
  • Kokan News
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल
1

Solapur News :१,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
2

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ
3

Mumbai : मूर्धा गावात महापुरुषांची छायाचित्रे कचऱ्यात, मोदींसह राष्ट्रनायकांची चित्रे आढळल्याने खळबळ

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
4

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.