Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागात किया सोनेटचा सर्वात कमी देखभाल खर्च

१२ डिसेंबर २०२३: कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागात किया सोनेटचा सर्वात कमी देखभाल खर्च असल्याचे फ्रॉस्‍ट अॅण्‍ड सुलिव्‍हन या भारतातील अव्‍वल ग्रोथ अॅडवायजरी कंपनीने जारी केलेल्या टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप बेंचमार्क विश्‍लेषणातून निदर्शनास आले आहे. डिझेल मॉडेल देखभाल खर्च १४ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे,

  • By Aparna
Updated On: Dec 13, 2023 | 08:15 PM
कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागात किया सोनेटचा सर्वात कमी देखभाल खर्च
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : १२ डिसेंबर २०२३: कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागात किया सोनेटचा सर्वात कमी देखभाल खर्च असल्याचे फ्रॉस्‍ट अॅण्‍ड सुलिव्‍हन या भारतातील अव्‍वल ग्रोथ अॅडवायजरी कंपनीने जारी केलेल्या टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप बेंचमार्क विश्‍लेषणातून निदर्शनास आले आहे. डिझेल मॉडेल देखभाल खर्च १४ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे, तर सोनेटच्‍या पेट्रोल मॉडेलचा देखभाल खर्च विभागातील सरासरी खर्चापेक्षा १६ टक्‍क्‍यांनी कमी आहे.

विश्‍लेषणामधून निदर्शनास येते की, सोनेटचे डिझेल मॉडेल परिपूर्ण व्‍हॅल्‍यू-फॉर-मनी पॅकेजसह विभागात अव्‍वलस्‍थानी आहे. डिझेल मॉडेलचा एकूण देखभाल खर्च विभागातील सरासरी खर्चापेक्षा १० टक्‍क्‍यांनी कमी असल्‍यामुळे ते विभागातील सर्वोत्तम मॉडेल आहे. पेट्रोल व्‍हेरिएण्‍ट विभागातील सरासरीपेक्षा ४ टक्‍क्‍यांनी कमी टीसीओसह दुसरे सर्वोत्तम मॉडेल ठरले आहे, जे विभागातील सर्वोत्तम मॉडेल्‍सच्‍या श्रेणीत आहे. तसेच विश्‍लेषणामधून निदर्शनास आले की, दोन्‍ही मॉडेल्‍सचे अवशिष्‍ट मूल्‍य (रेसिड्युअल व्‍हॅल्‍यू) विभागातील सरासरीपेक्षा ३ टक्‍क्‍यांनी अधिक आहे, ज्‍यामुळे मॉडेल्‍स विभागातील सर्वोत्तम मॉडेल्‍सच्‍या श्रेणीत आहेत. सोनेटसह ५ पेट्रोल व ३ डिझेल प्रतिस्‍पर्धी मॉडेल्‍सचे मूल्‍यांकन करण्‍यात आलेल्‍या सर्वसमावेशक विश्‍लेषणामधून मालकीहक्‍काच्‍या एकूण खर्चासह सुरूवातीचा संपादन खर्च, अवशिष्‍ट मूल्‍य, देखभाल खर्च, आर्थिक व विमा खर्च आणि इंधन खर्चांचा समावेश होता.

फ्रास्‍ट अॅण्‍ड सुलिव्‍हनच्‍या विश्‍लेषणामधून निदर्शनास आले की, डिझेल सोनेटचा नियोजित देखभाल खर्च जवळच्‍या प्रतिस्‍पर्धी मॉडेलच्‍या तुलनेत १७ टक्‍क्‍यांनी कमी आहे आणि विभागातील सरासरीपेक्षा २३ टक्‍क्‍यांनी कमी आहे. पेट्रोल सोनेट संदर्भात हा देखभाल खर्च जवळचे प्रतिस्‍पर्धी मॉडेल आणि इतर स्‍पर्धात्‍मक मॉडेल्‍सच्‍या तुलनेत अनुक्रमे ७ टक्‍के व २८ टक्‍क्‍यांनी कमी आहे. इतर कार्यपद्धतींसह वर्षभरात प्रवास केलेले सरासरी १०,००० किमी अंतर विचारात घेत विश्‍लेषणामधून निदर्शनास येते की, डिझेल व्‍हेरिएण्‍टची फ्यूएल इकॉनॉमी विभागात सर्वोत्तम आहे, जी विभागातील सरासरीपेक्षा ६ टक्‍क्‍यांनी कमी आहे. सोनेटसाठी सुधारित बाबींपैकी एक म्‍हणजे पेट्रोल मॉडेलमधील फ्यूएल इकॉनॉमी, जेथे पेट्रोल मॉडेल तिसऱ्या स्‍थानावर आहे आणि विभागातील सर्वोत्तम मॉडेल्‍सच्‍या जवळ आहे. विश्‍लेषणामधून पुष्‍टी मिळते की दोन्‍ही मॉडेल्‍सचे सुरुवातीचे संपादन, आर्थिक व विमा खर्च विभागातील सरासरी खर्चांपेक्षा कमी आहेत.

किया इंडियाच्‍या विक्री व विपणनाचे राष्‍ट्रीय प्रमुख श्री. हरदीप सिंग ब्रार म्‍हणाले,”या परिवर्तनामधून अपवादात्‍मक दर्जा व वैशिष्‍ट्ये वितरित करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, तसेच ग्राहक किफातयशीर दरामध्‍ये अधिक फायद्यांसह अद्वितीय मालकीहक्‍काचा आनंद घेत असल्‍याची खात्री देखील मिळते. आमचा बेंचमार्क्‍स स्‍थापित करण्‍यावर विश्‍वास आहे आणि फ्रास्‍ट अॅण्‍ड सुव्हिलनकडून मालकीहक्‍काच्‍या सर्वात कमी खर्चासाठी सोनेटला मिळालेल्‍या मान्‍यतेमधून उद्योग मानकांना नव्‍या उंचीवर नेण्‍याप्रती, तसेच सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍याप्रती आमची स्थिर कटिबद्धता दिसून येते.”

फ्रॉस्‍ट अॅण्‍ड सुलिव्‍हनचे प्रवक्‍ता म्‍हणाले, “आम्‍ही कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागाच्‍या मालकीहक्‍काच्‍या एकूण खर्च ट्रेण्‍ड्सचे विश्‍लेषण केले. किया सोनेट विभागातील सर्वात कमी देखभाल खर्चासह सर्वाधिक व्‍हॅल्‍यू-फॉर-मनी तत्त्व म्‍हणून यशस्‍वी ठरली, जी आव्‍हानात्‍मक उपलब्‍धी आहे.”

फ्रॉस्‍ट अॅण्‍ड सुलिव्‍हनच्‍या विश्‍लेषणामधील ठळक वैशिष्‍टये:

देखभाल खर्च: पेट्रोल व डिझेल मॉडेल्‍ससाठी विभागातील सर्वोत्तम

पेट्रोल मॉडेल: विभागातील सरासरीपेक्षा १६ टक्‍क्‍यांनी कमी

डिझेल मॉडेल: विभागातील सरासरीपेक्षा १४ टक्‍क्‍यांनी कमी

टोटल कॉस्‍ट ऑफ ओनरशीप:

सोनेट डिझेल: डिझेलमध्‍ये परिपूर्ण व्‍हॅल्‍यू फॉर मनी पॅकेजसह विभागातील सर्वोत्तम (सर्वात कमी टीसीओ); विभागातील सरासरीपेक्षा १० टक्‍क्‍यांनी कमी

सोनेट पेट्रोल: टीसीओ विभागातील सरासरीपेक्षा कमी आणि विभागात दुसरे सर्वोत्तम; विभागातील सरासरीपेक्षा ४ टक्‍क्‍यांनी कमी

अवशिष्‍ट मूल्‍य: विभागातील सरासरीपेक्षा ३ टक्‍के उच्‍च अवशिष्‍ट मूल्‍यासह विभागातील सर्वोत्तम

इंधन खर्च:

सोनेट डिझेल: विभागातील सर्वोत्तम. विभागातील सरासरीपेक्षा ६ टक्‍क्‍यांनी कमी

सोनेट पेट्रोल: टॉप ३ मध्‍ये; सर्वोत्तम मॉडेल्‍सच्‍या श्रेणीत

नियोजित देखभाल:

सोनेट पेट्रोल: नियोजित देखभाल खर्च जवळच्‍या प्रतिस्‍पर्धी मॉडेलच्‍या तुलनेत ७ टक्‍क्‍यांनी कमी आहे आणि विभागातील सरासरी खर्चापेक्षा २५ टक्‍क्‍यांनी कमी आहे.

सोनेट डिझेल: नियोजित देखभाल खर्च जवळच्‍या प्रतिस्‍पर्धी मॉडेलच्‍या तुलनेत १७ टक्‍क्‍यांनी कमी आहे आणि विभागातील सरासरी खर्चापेक्षा २४ टक्‍क्‍यांनी कमी आहे.

कमी पार्टस् रिप्‍लेसमेंट फ्रिक्‍वेन्‍सीजमुळे सोनेटचा देखभाल खर्च कमी राहण्‍यास मदत होते.

Web Title: Kia sonet has the lowest maintenance cost in the compact suv segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2023 | 08:15 PM

Topics:  

  • kia sonet
  • maharashtra
  • maharashtra news
  • Mumbai
  • Mumbai News

संबंधित बातम्या

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
1

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक
2

Thane Election 2025: ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसाठी शिवसेनेतून ३३४८ इच्छुक

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना
3

वाशी सुविधा केंद्रातून हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ
4

Farmers News : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! धान खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.