Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनुमान मंदिरात जाऊन महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार, किरीट सोमय्यांची घोषणा

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले की, हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार आहे. मविआ सरकारच्या घोटाळ्याचं दहन करण्यासाठी, त्यांच्या घोटाळ्याची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) २४ घोटाळे बाहेर काढले आहेत.

  • By साधना
Updated On: Apr 16, 2022 | 04:30 PM
हनुमान मंदिरात जाऊन महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार, किरीट सोमय्यांची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भोंगे हटवण्यासाठी त्यांनी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. इतकंच नाही तर भोंगे हटवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिले आहेत. दुसरीकडे आज हनुमान जयंतीनिमित्त मनसे, भाजपसह महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) घटकपक्षांकडून हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर सोमय्या यांनी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच असा निर्धारही व्यक्त केला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, हनुमान जयंतीनिमित्त आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार आहे. मविआ सरकारच्या घोटाळ्याचं दहन करण्यासाठी, त्यांच्या घोटाळ्याची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील २४ घोटाळे बाहेर काढले आहेत. नवाब मलिकांपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत सगळ्यांचे घोटाळे काढले. प्रवीण कलमे सध्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात येत जात असतो. लोक आता संजय राऊतांवर हसू लागले आहेत. माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नाही तर उद्धव ठाकरेंचे आहेत. १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप काल केला, परवा सामनात ३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ही सगळी नौटंकी आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्याचबरोबर राऊतांनी केलेल्या आरोपांबाबत बोलण्यासाठी आपण स्वत:च पोलिसांसमोर जाणार असल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं होतं. ‘पाच घोटाळे काढले, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी नॉट रिचेबल झालो. त्याचा खुलासा लवकरच करणार आहे. उद्धव ठाकरे यांची स्ट्रॅटेजी आहे. आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही. काही करा पण एफआयआर करा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिला आहे. ठाकरे साहेब आता तुम्ही मेधा सोमय्यांच्या मागे लागलात. पण काही सापडणार नाही, आम्ही घाबरत नाही. अचानक ५८ कोटीचा आकडा संजय राऊतांच्या डोक्यात कसा आला? संजय राऊतांकडे कोणताही पुरावा नाही. मी सोमवारी पोलिसांसमोर जाणार आणि विचारणार की तुम्हाला काय विचारायचं ते विचारा’, असं सोमय्या म्हणाले होते.

Web Title: Kirit somaiya to disclose more scams of mahavikas aghadi government nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2022 | 04:26 PM

Topics:  

  • kirit somaiya
  • maharashtra
  • mahavikas aghadi government

संबंधित बातम्या

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
1

Satara: कारखानदारांच्या मनमानीविरुद्ध किसान काँग्रेस एल्गार पुकारणार! जिल्हाध्यक्ष वसीम इनामदार यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा
2

अमेझॉनची नवी घोषणा, 1000 पेक्षा कमी उत्पादनांवर झिरो-रेफरल शुल्क; विक्रेत्यांना मोठा दिलासा

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर
3

E vehicle News : महाराष्ट्रात ई-वाहनांना चालना; शासनाकडून कोट्यवधींचे अनुदान मंजूर

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली
4

किर्लोस्कर न्युमॅटिककडून नेतृत्वातील बदलाची घोषणा; अमन किर्लोस्कर यांनी व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.