Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, काय आहे कारण?

कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 16, 2024 | 02:33 PM
मुख्यमंत्री शिंदे व फडणवीसांविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरवून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात कुलाबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कर्नाटकातील घटनेची सत्य माहिती

१३ सप्टेंबर रोजी बेंगलूरूच्या टाऊन हॉल परिसरात कोणतीही परवानगी न घेता विश्व हिंदू परिषदेने आंदोलन आयोजित केले होते. यावेळी आंदोलक गणपतीची मूर्ती घेऊन आंदोलन करत होते. आंदोलकांना ताब्यात घेताना मूर्तीला इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी मूर्ती सुरक्षित ठेवली व आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विधिवत पूजा अर्चना करून गणपती बप्पाचे विसर्जन केले. ही माहिती अनेक फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट्स व राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी फॅक्ट चेकच्या माध्यमातून सार्वजनिक केली आहे.

पण राजकीय फायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया देताना कर्नाटक सरकारने व पोलिसांनी गणपती उत्सव थांबवून गणपतीची मूर्ती जप्त केली असे धडधडीत असत्य विधान करून सणासुदीच्या काळात राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स (ट्वीटर) हँडलवरून या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करून कर्नाटकच्या काँग्रेसला जबाबदार धरले. तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या संदर्भात खोटी माहिती प्रसारित करून समाजात तेढ आणि धार्मिक तणाव निर्माण करण्याचा व सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई अशी मागणी करणारी लेखी तक्रार प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष अ‍ॅड. रविप्रकाश जाधव यांनी कुलाबा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकाकडे केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून सातत्याने फेक न्यूज आणि अफवा पसरवून राज्यात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांचे हे कृत्य सामाजिक शांतता भंग करणारे आहे. पोलिसांनी यांची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.

Web Title: Know why complaint was filed against chief minister eknath shinde and devendra fadnavis in colaba police station nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 02:33 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम
1

Maharashtra 1st Conclave: जागतिक गुंतवणूक आणि विकासावर मंथन; 19 मे रोजी मुंबईत दिग्गजांचा महासंगम

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल
2

“महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल,” जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून फडणवीसांचे खडेबोल

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
3

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

Breaking News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
4

Breaking News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात ‘या’ तारखेपासून होणार कर्जमाफी, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.