file photo
file photo

मनसेच्या तीन नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू आहे.

    मुंबई:  येत्या काळात लोकसभा निवडणूक असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात काही ना काही घडामोडी घडत आहेत. यामुळे काही ना काही चर्चांना उधाण येत असतं. सध्या अशाच एका घडमोडीनं सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. ती म्हणजे भाजप आणि मनसे नेत्यांमध्ये झालेली बैठक. मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक (MNS Leader Meet BJP Leader) झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.

    मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीमागचं नेमकं कारण दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलेलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बऱ्याचदा एका व्यासपीठावर दिसले. तेव्हाही युतीची चर्चा रंगली. भाजपच्या नेत्यांनीही राज यांची अनेकदा भेट घेतली.