Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल

पन्हाळ्यात आता'ताऱ्यांची सफर' हा अनोखाउपक्रम सुरू झाला असून,अत्याधुनिक दुर्बिणीतून प्रत्यक्षआकाश दर्शनाचा अनुभव पर्यटकांना दररोज घेता येणारआहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 20, 2026 | 01:22 PM
Kolhapur News : पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर ; दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल
Follow Us
Follow Us:
  • पन्हाळ्यात होणार रोज ताऱ्यांची सफर
  • दुर्बिणीतून पाहायला मिळणार ग्रहमंडल
पन्हाळा : रात्रीच्या शांत अंधारात आकाशभर पसरलेले असंख्य तारे प्रत्येकाच्या मनात कुतूहल निर्माण करतात. हे तारे नेमके कोणते, त्यांची वैशिष्ट्ये काय,चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके काय दिसते, त्याची निर्मिती कशी झाली असेल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. या नैसर्गिक कुतूहलाला विज्ञानाची जोड देत पन्हाळ्यात आता’ताऱ्यांची सफर’ हा अनोखाउपक्रम सुरू झाला असून,अत्याधुनिक दुर्बिणीतून प्रत्यक्षआकाश दर्शनाचा अनुभव पर्यटकांना दररोज घेता येणारआहे. पन्हाळ्यातील युवक इरफान मुजावर यांनी आपल्याआवडीला नवे रूप देत हा उपक्रम साकारला आहे.

पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून उपक्रमाला प्रतिसाद
खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी अवकाश निरीक्षणाची आवड जोपासत अत्याधुनिक दुर्बीण खरेदी केली. पन्हाळ्याच्या निसर्गसंपन्न वातावरणाचा, स्वच्छ आकाशाचा आणि पर्यटनस्थळ म्हणून असलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करून त्यांनी शिवतीर्थ उद्यान येथे या उपक्रमाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दुर्बिणीतून मंगळ, गुरु आणि शुक्र या ग्रहांचे तसेच त्याच्या उपग्रहांचे स्पष्ट दर्शन घडवले जात आहे. याशिवाय चंद्राचा पृष्ठभाग अगदी जवळून पाहण्याची संधी मिळत असल्याने याबाबत आकर्षण अधिकच वाढताना दिसत आहे.

Kolhapur News : ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

रात्री आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी
विशेष म्हणजे स्वच्छ आकाशात तेजस्वी दिसणारा ‘सिरीयस’ हा तारा देखील या दुर्बिणीतून पाहता येत असून, आकाश निरीक्षणाचा हा अनुभव पर्यटकांसाठी संस्मरणीय ठरत आहे. ऐतिहासिक वारसा, थंड हवामान आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्हाळ्यात या उपक्रमामुळे ‘आकाश पर्यटन’ ही नवी संकल्पना आकार घेत आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांना दिवसभर ऐतिहासिक स्थळांची सफर केल्यानंतर रात्री आकाश निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम ज्ञानवर्धक ठरत असून, विज्ञानाविषयीची आवड निर्माण करण्यासही तो उपयुक्त ठरत आहे.

पन्हाळ्याच्या पर्यटनात एक वेगळी आणि आधुनिक भर घालणारा उपक्रम सुरू
या उपक्रमासाठी नाममात्र शुल्क आकारले जात असले तरी मिळणारा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा असल्याची प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. लोकांनी आकाश केवळ पाहू नये, तर ते समजून घ्यावे,हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भविष्यात आणखी अत्याधुनिक दुर्बिणी उपलब्ध करून देत अधिक सखोल माहिती देण्याचा प्रयत्न राहील, असे इरफान मुजावर यांनी सांगितले. पन्हाळ्याच्या पर्यटनात एक वेगळी आणि आधुनिक भर घालणारा हा उपक्रम भविष्यात अधिक विस्तारेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, ‘ता-यांची सफर’ ही संकल्पना आता पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

Kolhapur News : एसटीच्या ताफ्यात आठ हजार नव्या बस येणार ! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Web Title: Kolhapur news daily stargazing will be held in panhala planets will be visible through telescopes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.