Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक ; 17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

शिराळा तालुक्यातील शिवणी धरणात केवळ 16 टक्के पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याला पाणी सोडणे पूर्णपणे बंद झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 18, 2026 | 01:47 PM
आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

आंबेगाव डिंभे धरणाच्या पाण्याखाली; धरणातील पाणीसाठा सध्या केवळ दहा टक्क्यांवर

Follow Us
Follow Us:

ऐन उन्हाळ्याच धरण कोरडं ठाक
17 टक्के पाणीसाठ्याने पाणीप्रश्न आणि शेती धोक्यात

कोल्हापूर : शिराळा तालुक्यातील शिवणी धरणात केवळ 16 टक्के पाणी शिल्लक आहे. धरणातील पाणी गेटपर्यंत पोहोचत नसल्याने कालव्याला पाणी सोडणे पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे शिराळा, खेड व शिवणी परिसरांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून ऊस व भाजीपाला पिके वाळू लागली आहेत. यावर्षी कमी पावसामुळे शिवणी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेले सुमारे 15हेक्टर ऊसक्षेत्र सध्या धोक्यात आले आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी शिवणी धरणात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील विहिरींनी तळ गाठला असून 330कूपनलिकांची पाण्याची पातळीही खालावली आहे. त्यापैकी 35 कूपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील 20 पाझर तलाव पूर्णपणे कोरडे पडले असून उर्वरित तलावांमध्ये सुमारे 20 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी योजनेतून 157.02 द.ल.घ.फू. पाणी उपलब्ध वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेमुळे करमजाई व मोरणा धरणांवर अवलंबून असलेल्या शेतीला मोठा फायदा झाला आहे. मागील वर्षी या योजनेतून 157.02 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले होते. करमजाई धरणात पाणी सोडण्यात आले आहे. शिवणी व मोरणा धरणात सोडण्याची मागणी आहे. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडले जाते, तर आठ दिवस बंद ठेवले जाते. या पाण्यामुळे शिराळा शहर व एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. तसेच उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव व मांगले या गावांतील शेतीला लाभ होतो.

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

ऊस, भाजीपाला शेती धोक्यात; वाकुर्डे बुद्रुकचे पाणी ‘मोरणा’त सोडण्याची मागणी

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. ऊस व भाजीपाला पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचा फायदा शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांपेक्षा कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात होत आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजना शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात व नदीमध्ये आले नाही. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणात सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी करमजाई धरणात आले,

मात्र अंत्री धरण व मोरणा धरणात आले नाही. करमजाई धरणातून वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी दरवर्षी कराड तालुक्यातील दक्षिण मांड नदीत सोडले जाते. कराड तालुक्यातील 2772हेक्टर क्षेत्राला पाणी मिळत आहे. घोगाव, उंडाळे तलावात पाणी सोडले जाते. मोरणा धरणात 42टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी तो 35टक्के होता. मोरणा धरणातून सात दिवस पाणी सोडण्यात येते, तर आठ दिवस बंद असते. मोरणातील पाण्यावर 495 हेक्टर ऊसक्षेत्र भिजते. मोरणा क्षेत्रातील शिराळा, उपवळे, पाडळी, बिऊर, तडवळे, अंत्री, भाटशिरगाव, मांगले या गावांतील शेतीला या पाण्याचा फायदा होतो. शिराळा शहराला व शिराळा एम.आय.डी.सी.ला पाणीपुरवठा होतो.

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

Web Title: Kolhapur news dam runs dry in the middle of summer 17 percent water storage poses water problem and agriculture in danger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था
1

GDP वाढीबाबत मोठी Good News! 7.7% च्या ऐतिहासिक वेगाने धावणार भारताची अर्थव्यवस्था

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध
2

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त HPCLचा मोठा निर्णय! ‘HP Racer Green’ आता 100% पुनर्वापरित पॅकेजिंगमध्ये उपलब्ध

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार
3

पालघरमध्ये जलक्रांती! 18 गावांतील 1800 शेतकरी कुटुंबांसाठी रुस्तमजी आणि रोटरी क्लबचा मोठा पुढाकार

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी
4

8th Pay Commission : पेन्शन थेट पगाराइतकी होणार? 8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींपूर्वी केंद्र सरकारकडे मोठी मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.