Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोट्यावधीचा खर्च करुन देखील शहर चकऱ्याच्या विळख्यात; दुर्गंधीमुळे नागरिकांचे होतायत हाल

इचलकरंजी शहरात स्वच्छतेसाठी दर महिन्याला लाखो रुपये आणि वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे अधिकृत आकडे सांगतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 17, 2026 | 02:05 PM
Kolhapur News : कोट्यावधीचा खर्च करुन देखील शहर चकऱ्याच्या विळख्यात; दुर्गंधीमुळे नागरिकांचे होतायत हाल
Follow Us
Follow Us:
  • कोट्यावधीचा खर्च करुन देखील शहर चकऱ्याच्या विळख्यात
  • दुर्गंधीमुळे नागरिकांचे होतायत हाल
कोल्हापूर : इचलकरंजी शहरात स्वच्छतेसाठी दर महिन्याला लाखो रुपये आणि वर्षाला कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचे अधिकृत आकडे सांगतात. मात्र प्रत्यक्षात शहराची स्थिती पाहता हा सर्व खर्च कुठे जात आहेत, असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिग, अस्वच्छ रस्ते, गटारांची दुरवस्था आणि दुर्गंधी यामुळे नागरिकांचे जीवनमान खालावत चालले आहे.

महापालिकेकडून स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. कंत्राटदारांना कामे देऊन शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी दिली जाते. तरीही प्रत्यक्ष कामांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. कंत्राटदार आणि काही अधिकारी यांच्यातील संगनमतामुळे निधीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कागदोपत्री स्वच्छता होत असल्याचे दाखवले जात असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. दरम्यान, या मुद्द्यावर विरोधी पक्षाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. इतक्या गंभीर विषयावरही विरोधी पक्ष नेते शांत असल्यामुळे नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे. विरोधकही या सगळ्या प्रकारात सहभागी आहेत का? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अस्वच्छ शहरामुळे नागरिकामध्ये संतापाची भावना वाढत आहे. करोडो रुपये खर्च होतात, पण शहराची अवस्था दिवसेंदिवस खालावत आहे. मग हा पैसा नेमका जातो कुठे? असा सवाल स्थानिक रहिवासी विचारत आहेत.काही सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा तसेच उपनगरांमध्ये नियमित साफसफाई होत नसल्याचे चित्र दिसते. काही भागांमध्ये आठवड्यानंतरही कचरा उचलला जात नाही. परिणामी डास, माशा आणि इतर कीटकांची वाढ होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.

Kolhapur News : पाणी संकट धरणसाठा 51 टक्क्यांवर; गेल्या वर्षाच्या तुलनेत पाणीपातळीत घट कोल्हापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट ?

स्वच्छतेप्रश्नी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि पारदर्शकतेची कमतरता यामुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून मात्र सर्व आरोप फेटाळण्यात येत आहेत. स्वच्छतेची कामे नियमानुसार सुरू असल्याचा दावा ते करतात. मात्र नागरिकांना या दाव्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे.

स्वच्छ इचलकरंजी संकल्पना कागदावरच
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वच्छतेच्या कामांमध्ये पारदर्शकता आणावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा स्वच्छ शहर ही संकल्पना केवळ कागदावरच मर्यादित राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kolhapur news despite spending crores the city is in a state of chaos citizens are suffering due to stench

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • kolhapur news
  • marathi latest news
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.