Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड

नवीन डिजिटल व्यवस्था विकसित रासायनिक खतांचा काळाबाजार रोखणे, खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे तसेच शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामामध्ये वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खत विक्री उपयोजन प्रणाली ही नवीन डिजिटल व्यवस्था विकसित करण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 28, 2026 | 03:02 PM
Kolhapur News : खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू; ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड
Follow Us
Follow Us:
  • खतांचा काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरू
  • ‘डिजिटल खत वितरण प्रणाली’साठी कोल्हापूर जिल्ह्याची निवड
Kolhapur News :  नवीन डिजिटल व्यवस्था विकसित रासायनिक खतांचा काळाबाजार रोखणे, खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे तसेच शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामामध्ये वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या कृषी विभागामार्फत खत विक्री उपयोजन प्रणाली ही नवीन डिजिटल व्यवस्था विकसित करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातून या महत्त्वाकांक्षी पथदर्शी प्रकल्पासाठी केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोनच जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या आधुनिक डिजिटल व्यवस्थेमुळे जिल्ह्यातील खत वितरण अधिक गतिमान, पारदर्शक व शेतकरी हिताचे होण्यास मदत होणार असून, शेतकऱ्यांचा अमूल्य वेळ आणि श्रम वाचणार आहे.

केंद्र शासनाच्या या अत्यंत महत्त्वाकांक्षी डिजिटल प्रणालीमध्ये खत साठा व्यवस्थापन आणि शेतकरी माहिती तंत्रज्ञानाचे यशस्वी एकत्रीकरण करण्यात आले आहे. या आधुनिक सुविधेमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या मोबाईलवरील सुविधेद्वारे त्यांच्या परिसरातील अधिकृत खत विक्री केंद्रांवर नेमका किती खतसाठा उपलब्ध आहे, याची अचूक माहिती मिळणार आहे.

व्यापाऱ्यांच्या सक्तीला बसणार चाप

अनेकदा खरीप हंगामात खतांच्या टंचाईची अफवा पसरवून किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जाते. नवीन ऑनलाइन नोंदणी प्रणालीमुळे रांगांमधून पूर्णपणे मुक्ती होणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बाजारात काही व्यापा-यांकडून मुख्य खतासोबत इतर अनावश्यक उत्पादने किवा दुय्यम दर्जाची खते खरेदी करण्याची सक्ती केली जाते. या ऑनलाइन नोंदणी सुविधेमुळे व्यापाऱ्यांची अशी मनमानी आणि सक्ती मोडून काढण्यास मोठी मदत होणार असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल.

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ

शेतकऱ्यांनी डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा

८ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या नवीन डिजिटल खत वितरण प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, मोबाईल आधारित ऑनलाइन खत नोंदणी सुविधेचा वापर करून आपला वेळ आणि श्रम वाचवावा. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावी व जिल्ह्यात एक पारदर्शक खत वितरण व्यवस्था निर्माण करण्यासाठी कृषी विभागाला पूर्ण सहकार्य करावे. जालिंदर पांगिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

ऑनलाइन आगाऊ नोंदणी आणि ३ दिवसांची वैधता

या प्रणालीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे शेतक-यांना आता मोबाईलद्वारे आवश्यक असलेल्या खताची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी केल्यानंतर एक विशेष सांकेतिक कोड (क्यूआर कोड) तयार होईल, शेतकऱ्यांनी मोबाईलवर केलेले हे आरक्षण पुढील तीन दिवसांसाठी वैध राहील, या तीन दिवसांच्या कालावधीत शेतकरी आपल्या सवडीनुसार आणि सोयीनुसार संबंधित खत विक्रेत्याकडे जाऊन आपल्या हक्काचे खत खरेदी करू शकतील, ज्यामुळे खत खरेदीची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत होणार आहे.

Gokul Dudh Sangha बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; सत्ताधारी गटाला मोठा दिलासा

Web Title: Kolhapur news efforts to stop black marketing of fertilizers underway kolhapur district selected for digital fertilizer distribution system

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
1

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?
2

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत युरियाबाबत मोठा निर्णय, नव्या धोरणात कोणते 3 मोठे बदल?

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप
3

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील
4

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.