Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Real Estate: रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल! DLF च्या साम्राज्याला गौतम अदानींचा धक्का; थेट पहिल्या स्थानावर झेप

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'GROHE-Hurun India Real Estate Rich List 150 (2026)' च्या अहवालानुसार रिअल इस्टेट क्षेत्रात मोठा फेरबदल झाला आहे. अदानी समूहाचे गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी DLF च्या राजीव सिंह यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजक बनण्याचा मान मिळवला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 07:30 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • DLF च्या साम्राज्याला धक्का!
  • रिअल इस्टेट मार्केटमध्ये अदानींचा धमाका
  • थेट पहिल्या स्थानावर झेप
Real Estate: भारतातील अव्वल उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी यांच्या नावाचा सातत्याने समावेश असतो. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत, ज्यामुळे या यादीत त्यांचे नाव नेहमीच पहिल्या १० मध्ये असते. पण आता ते रिअल इस्टेटच्या जगातही किंग बनले आहेत. गौतम अदानी यांनी नुकतेच DLF चे राजीव सिंग यांना मागे टाकत, सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत कोण कोण आहे?

गॅस बुकिंगचे टेन्शन संपलं! आता इन्स्टामार्टवरून ऑर्डर करा गॅस सिलिंडर! HPCL ने लाँच केला नवा ‘कंपोझिट सिलिंडर’ ब्रँड

गौतम अदानी बनले रिअल इस्टेटचे किंग

‘ग्रोहे-हुरुन इंडिया रिअल इस्टेट २०२६’ मधील १५० व्यक्तींची यादी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पहिल्यांदाच, गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाने भारतातील सर्वात श्रीमंत रिअल इस्टेट उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. या अहवालानुसार, अदानी कुटुंबाची स्थावर मालमत्ता अंदाजे ₹९०,४०० कोटींवर पोहोचली आहे. एका वर्षात त्यांच्या संपत्तीत ७३% वाढ झाली आहे. अदानी समूहाने निवासी, व्यावसायिक, टाउनशिप आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वेगाने विस्तार केला आहे, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीच्या वाढीस हातभार लागला आहे.

DLF च्या किंगची खुर्ची बळकावली

अदानी आणि त्यांच्या कुटुंबापूर्वी, DLF चे राजीव सिंग आणि त्यांचे कुटुंब बऱ्याच काळापासून यादीत अव्वल स्थानी होते. पण आता अदानी कुटुंबाने त्यांना पदच्युत केले आहे. राजीव सिंग आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ₹९०,२०० कोटींपर्यंत घसरली आहे. बाजारातील घसरणीमुळे त्यांच्या संपत्तीत २९% घट झाली असून, ते यादीत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत.

टॉप १० यादीत यांचा समावेश

या यादीतील टॉप १० मध्ये असलेल्या भारतीय रिअल इस्टेट टायकून्सची यादी खालीलप्रमाणे आहे:

गौतम अदानी आणि कुटुंब
राजीव सिंग आणि कुटुंब
मंगल प्रभात लोढा आणि कुटुंब
विकास ओबेरॉय आणि कुटुंब
चंद्रू रहेजा आणि कुटुंब
अतुल रुईया आणि कुटुंब
राजा बागमाने आणि कुटुंब
निरंजन हिरानंदानी आणि कुटुंब
बसंत बन्सल आणि कुटुंब
विजय कुमार अग्रवाल आणि कुटुंब

भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र बदलतंय

या अहवालात असेही नमूद केले आहे की, केवळ पारंपरिक बिल्डर्सच नव्हे, तर मोठे व्यावसायिक समूहही भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात आपला विस्तार वेगाने करत आहेत. अदानी ग्रुपचा वाढता वाटा याच बदलाकडे निर्देश करतो. तथापि, बाजारमूल्यानुसार डीएलएफ ही देशातील सर्वात मोठी सूचीबद्ध रिअल इस्टेट कंपनी आहे.

8th Pay Commission बाबत मोठी अपडेट! फक्त पगार वाढणार नाही, तर HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

Web Title: A big change in the real estate sector gautam adani tops dlfs empire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 07:30 PM

Topics:  

  • Adani
  • Adani Group
  • Adani News
  • adani shares
  • Business News
  • Gautam Adani
  • Marathi News
  • real estate

संबंधित बातम्या

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख
1

Krishna Shroff: क्रीडा विश्वापासून बिझनेसपर्यंत दबदबा! कृष्णा श्रॉफची ‘स्पोर्ट्स क्वीन’ म्हणून दमदार ओळख

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर
2

Zimbabwe vs Namibia T20I: रेकॉर्डवर रेकॉर्ड! एकच विश्वविक्रम दोनदा मोडला, सातव्या जोडीचा तुफान कहर

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!
3

AM/NS इंडिया आणि ICAR-IARI च्या संशोधनातून मोठा खुलासा, लोह खनिजाच्या टाकाऊ घटकांपासून सुधारेल जमिनीचे आरोग्य!

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
4

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.