Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारखाने बंद, ग्राहक गायब…चीनमध्ये ऐतिहासिक मंदी! 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ, GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे

चीनची अर्थव्यवस्था सध्या गेल्या ३ वर्षांतील सर्वात मोठ्या मंदीचा सामना करत आहे. चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत चीनचा जीडीपी वाढीचा दर घसरून ४.३% वर आला आहे, जो त्यांच्या अधिकृत उद्दिष्टापेक्षा कमी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 15, 2026 | 08:28 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चीनमध्ये ऐतिहासिक मंदी!
  • 3 वर्षांतील सर्वात वाईट काळ
  • GDP ग्रोथ रेटमध्ये भारतानेही टाकलं मागे
चीन, प्रगत देशांच्या लिस्टमध्ये नेहमी अव्वल नावांच्या यादीत असणार देश. पण सध्याच्या काळात चीनवर खुप वाईट परिस्थिती आल्याचं पाहायला मिळतं आहे. एका ताज्या अहवालानुसार, चीनकडून होणाऱ्या आयातीत भारत आघाडीवर आहे. यावरून असे दिसून येते की, भारतीय जनतेला चिनी वस्तू इतक्या आवडतात की चीनची निर्यात सातत्याने वाढत आहे. असे असूनही, चीनच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. इतकेच नव्हे तर, भारताला होणारी निर्यात घटली आहे. भारताने GDP वाढीच्या शर्यतीतही चीनला मागे टाकलं आहे. चीनमध्ये नेमकी परिस्थिती काय?

बाप रे! जगातील महागडी कॉफी बनते मांजराच्या मळापासून? किंमत ऐकून डोळे पांढरे पडतील

चीनच्या गतीचा वेग मंदावला

एका ताज्या अहवालानुसार, चीनचा जीडीपी वाढीचा दर ४.३ टक्के आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या चीनच्या GDP वाढीच्या अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीचा वाढीचा दर जानेवारी-मार्च तिमाहीपेक्षाही कमी आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान चीनचा GDP वाढीचा दर ५ टक्के होता. गेल्या अनेक वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी मंदावली आहे, ज्याची अर्थतज्ज्ञांनीही अपेक्षा केली नव्हती.

भारताने चीनवर केली मात

भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत चीनला लक्षणीयरीत्या मागे टाकले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, भारताचा GDP वाढीचा दर ७.८% नोंदवला गेला आहे, जो भविष्यात आणखी सुधारू शकतो. भारत चीनकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आयात करत असला तरी, भारताकडून चीनला होणाऱ्या निर्यातीचा दर खूपच कमी आहे.

चीनचा GDP का घसरतोय?

काही दिवसांपूर्वी, UBS चायनाचे मुख्य अर्थतज्ज्ञ यू सॉन्ग यांनी CNBC शी संवाद साधला, ज्या दरम्यान त्यांनी चीनच्या GDPबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी या GDP घसरणीची तीन मुख्य कारणे सांगितली. त्यांच्या मते, एआयच्या वाढीचा याच्याशी काहीही संबंध नाही, उलट चीनला त्याचा फायदा होतो.
यु सॉन्ग यांनी स्थावर मालमत्तेच्या संकटाला प्रमुख कारण म्हणून सांगितले आहे. चीनची मालमत्ता बाजारपेठ बऱ्याच काळापासून घसरणीत आहे. येथील लोक मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत.

दुसरे कारण म्हणजे चीनची खर्च करण्याची अनिच्छा. अमेरिका-इराण संघर्षामुळे चीनमध्ये इंधनाच्या किमती वाढल्या आहेत, ज्यामुळे लोक महागड्या ब्रँडेड वस्तू टाळून स्वस्त पर्यायांच्या शोधात आहेत. चीनच्या आर्थिक घसरणीचे एक कारण म्हणजे रोजगारातील घट. AI हा देखील एक घटक आहे, आणि जरी त्याचा चीनला फायदा होत असला तरी, त्याने कामगारांची संख्या लक्षणीयरीत्या कमी केली आहे.

गॅस बुकिंगचे टेन्शन संपलं! आता इन्स्टामार्टवरून ऑर्डर करा गॅस सिलिंडर! HPCL ने लाँच केला नवा ‘कंपोझिट सिलिंडर’ ब्रँड

Web Title: China gdp growth rate falls to 3 year low india beats china how see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Business News
  • China
  • GDP
  • Marathi News

संबंधित बातम्या

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू
1

US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”
2

नेपाळच्या पूरस्थितीने हेलावला ‘टॉक्सिक’चा गायक, घेतला मोठा निर्णय, म्हणाला- “मी लवकरच…”

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral
3

अगं बाईई… आता रोबोट्सनेही सुरू केली चीटिंग? शर्यत जिंकण्यासाठी लावला अजब डोकेबाजीतला जुगाड; Video Viral

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!
4

Jai Jai Swami Samarth Special Episode: रक्षाबंधनानिमित्त पाहायला मिळणार स्वामींच्या कृपेची अनोखी कथा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.