Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शेतीचा खर्च, मजुरांची टंचाई… बळीराजाने लढवली शक्कल, भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग

शासनाच्या आर्थिक सहाव्याची कसलीही अपेक्षा न बाळगता आपल्या उच्च शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर करत महागावमधील प्रगतशील शेतकरी गंगाधर पाटील यांनी माळरानावर यशस्वीरित्या शेती करुन दाखवली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2026 | 07:31 PM
Kolhapur News : शेतीचा खर्च, मजुरांची टंचाई… बळीराजाने लढवली शक्कल, भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग
Follow Us
Follow Us:
  • भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग,
  • बळीराजाची मेहनत फळाला
गडहिंग्लज : कृषीप्रधान देश म्हणून आपल्या भारत देशाची ओळख. मात्र आजच्या काळात शेती व्यवसायातून उत्पादित केलेल्या नगदी व खरीप हंगामातील पिकांना मिळत नसलेला हमीभाव, शेती उत्पादनाचा वाढत जाणारा खर्च, मजुराची प्रचंड टंचाई, खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे तरुण पिढी शेती व्यवसायाकडे वळत नसल्याचे चित्र ग्रामीणा भागात दिसून येत आहे. या सर्व बाबींवर मात करत व शासनाच्या आर्थिक सहाव्याची कसलीही अपेक्षा न बाळगता आपल्या उच्च शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर करत महागावमधील प्रगतशील शेतकरी गंगाधर पाटील यांनी माळरानावर कूपनलिकेच्या पाणी ठिबक सिंचन करून कमीत कमी पाण्यामध्ये उन्हाळी भुईमुगाचे पीक काढले आहे.

Kolhapur News : हॉटेल व्यावसायिकांचा पर्यावरणाशी ‘खेळ’ सुरू ;शहरातील हॉटेल्समुळे होतंय जलप्रदुषण!

सध्या सुरू असलेल्या प्रचंड उन्हाळ्याच्या झळा सोसत देखील भुईमुगाचे पीक हे माळरानावर तरारले आहे. धनलक्ष्मी या भुईमुगाच्या प्रजातीचे उत्पादन बोद पद्धतीने घेतले आहे. साडेतीन ते चार फुटाचा एक बोद निर्माण करून दीड ते दोन फुटावर टोकन करत एका बोदावर तीन सऱ्या या पद्धतीने हे उत्पादन घेतले आहे. रासायनिक खताऐवजी सुरुवातीपासूनच सेंद्रिय खतांचा वापर केल्यामुळे भुईमुगाचे पीक हे तरारले आहे. अंदाजे एक एकर क्षेत्रामधून दीडशे ते पावणेदोनशे क्विंटल भुईमुगाचे उत्पादन मिळण्याची शक्यता असल्यामुळे एकरी दीड लाख ते दोन लाख असे उत्पादन या भुईमुगाच्या पिकातून मिळणार आहे.

८ सध्याच्या काळात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करत मल्चिंग पेपरच्या सहाय्याने जर उत्पादन घेतले, तर चांगले उत्पादन मिळते, रासायनिक खतांचा कमी वापर करत सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केल्यास त्याचाही फायदा शेतकऱ्याला होतो. बाजारभावाचे व शेतमालाच्या मागणीचे थोडेफार ज्ञान ठेवले असता शेती व्यवसाय हा फायदेशीर ठरू शकतो. – गंगाधर पाटील, प्रगतशील शेतकरी महागांव

आधुनिकतेची जोड देत शेतीचे उत्पादन
परंपरागत शेतीला फाटा देत गंगाधर पाटील यांनी पत्नी सावित्री हिच्या कष्टातून ही शेती फुलवली आहे. भुईमुगाबरोबरच चवळी, घेवडा, मिरची, वांगी, कांदा अशा विविध पिकांचे उत्पादन देखील मल्चिंग पेपरचा वापर करत परंपरागत शेती पद्धतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गंगाधर पाटलांचा हा प्रयोग हा आदर्शवत वाटत आहे.

Kolhapur News : एसटीची डिजिटल मोहीम ; एनसीएमसी कार्डाची नोंदणी नसल्याने खेड्यात उडाला पुरता फज्जा

Web Title: Kolhapur news groundnuts scattered on the grasslands in the hot sun in gadhinglaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.