फोटो सौजन्य: गुगल
शहरी आगारांची ‘डिजिटल’ भरारी
शहरातील प्रवाशांनी सुट्या पैशांच्या कटकटीतून
मुक्त होण्यासाठी या स्मार्ट कार्डला भरघोस प्रतिसाद दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहरी आणि निमशहरी आगारांनी मोठी मजल मारली आहे. शहरी भागात तंत्रज्ञानाचा वापर आणि जनजागृती अधिक असल्याने प्रवाशांनी रांगा लावून कार्डाची नोंदणी केल्याचे चित्र आहे.
संभाजीनगर आगारः ८६२ (विभागात प्रथम)
कोल्हापूर आगारः ८२५ (द्वितीय)
इचलकरंजी आगारः ४६४
गडहिंग्लज आगारः ६२९
राधानगरी आगारः ३९४
सुट्या पैशांचा वाद मिटवण्यासाठी कार्ड
एसटी प्रवासात पाच दहा रुपयांच्या सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये होणारे वाद ग्रामीण भागातील लांब पल्ल्याच्या बसमध्ये नित्याचेच आहेत. हे कार्ड या वादावर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकते. ग्रामीण जनता अद्यापही पारंपरिक ‘रोख’ व्यवहारावरच अवलंबून असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
एकीकडे शहरात डिजिटल क्रांतीची चर्चा असताना, दुसरीकडे ग्रामीण भागातील सहा आगारांची आकडेवारी पाहून प्रशासन हादरले आहे. मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, गगनबावडा आणि आजरा या सहा आगारामध्ये नोंदणीचा आकडा अद्याप ‘शून्य’ आहे. कागल आणि आज-यासारख्या प्रगत तालुक्यांतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, तरीही तिथे एकाही कार्डाची नोंदणी न होणे हे आगार व्यवस्थापनाचे अपयश मानले जात आहे. ग्रामीण प्रवाशांना या योजनेची माहितीच नाही की आगारातील यंत्रणा सुस्त आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
नियंत्रकांचे कडक आदेश
मोबिलिटी कार्ड ही महामंडळाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शहरी भागात मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे, मात्र ग्रामीण भागातील ६ आगारांची कामगिरी शून्य असणे है चिंताजनक आहे. या आगारांच्या व्यवस्थापकांन आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामीण प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर हेल्प डेस्क सुरू करण्यात आल असून, येत्या आठवडचात या सर्व आगारांचे खात उघडले जाईल याची खबरदारी आम्ही घेत आहोत.
अभय देशमुख, विभाग नियंत्रक, कोल्हापूर






